पुण्याच्या नुरेहीरा मस्जिदची औशात गरजूंना मदत
औसा:(प्रतिनिधी/नदीम सय्यद) नुरेहिरा मस्जिद कमिटी मार्केट यार्ड पुणे यांच्या तर्फे राज्यातील कोरोना ग्रस्ताना संकटकलीन मदत जीवनावश्यक वस्तूंच्या रूपाने देण्यात येत आहे. गुरुवार दिनांक २१ मे २०२० रोजी औसा शहरातील सुमारे ७५ व तालुक्यातील ग्रामीण भागातील ३२५ अशा एकूण ४०० सर्वधर्मीय गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन आधार देण्यात आला. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव ऐन रमजान महिन्यात आल्याने समाजातील गरजूंची उपासमार होऊ नये म्हणून नुरेहिरा मस्जिद कमिटीच्या वतीने मौलाना फारूक, मुफ्ती बिलाल, हफिजभाई फैज व अनिस कूट्टी यांच्यासह नुरेहीरा मस्जिद कमिटी पुणे येथील मान्यवर उपस्थित होते.
0 Comments