Latest News

6/recent/ticker-posts

अर्धांगिनीच्या नावाने जमेल त्या ठिकाणी एक वडाचे रोप लावावे - योगेश शर्मा

अर्धांगिनीच्या नावाने जमेल त्या ठिकाणी एक वडाचे रोप लावावे - योगेश शर्मा


यंदाची वटसावित्री पोर्णिमा हटके, अन काळाची गरज ओळखून



लातूर:सावित्रीच्या लेकीने,आमच्या माता अन भगिनींनो ५ जून अर्थात पर्यावरण दिन आणि वटसावित्री पौर्णिमा यंदा एकत्र आली आहे. जगाची अन आपल्या देशाची परिस्थिती पाहता आता निसर्ग संवर्धन काळाची गरज बनली आहे.अशात यंदा लॉकडाऊन स्थिती... चार पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास सक्त मनाई. तुम्ही सर्वच तर जागरूक महिला आहात त्यामुळे नियमांचे पालन तंतोतंत करणारच आहात.वटसावित्री पौर्णिमेला सर्वच विवाहित महिला वडाच्या झाडाचे पूजन करून सातो जन्मी हाच पती मिळो हा संकल्प मांडतात. यंदा महिलांनी वडाच्या झाडांचे पूजन करून एक वडाचे झाडही लावावे अशी विनंती वसुंधरा प्रतिष्ठान,लातूर करीत आहे. झाड लावण्यास आपल्याकडे जागा उपलब्ध नसल्यास आम्हास वसुंधरा ट्री बँकेस १ वडाचे झाड भेट द्यावे त्या झाडाचे वट वृक्षात रूपांतर करण्याची हमी देत आहे. आजवर केवळ महिलाच हा उत्सव साजरा करायच्या. यंदा पुरुषांनीही आपल्या अर्धांगिनीच्या नावाने जमेल त्या ठिकाणी एक वडाचे रोप लावावे ही आग्रहाची विनंती करीत आहे.निसर्ग संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक जण यावर अवलंबून आहे. तेंव्हा आजपासूनच नियोजन करून आपण या उपक्रमात कसा सहभाग घेता येईल यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. अधिक माहिती साठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे अहवान सदर संस्थेचे अध्यक्ष यांनी केले आहे ९८५००२८७११


Post a Comment

0 Comments