Latest News

6/recent/ticker-posts

हॉकर्स व्यवसाइकाना जागा उपलब्ध करू देण्यासाठी स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे पालिकेसमोर आगळे-वेगळे आंदोलन

हॉकर्स व्यवसाइकाना जागा उपलब्ध करू देण्यासाठी स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे पालिकेसमोर आगळे-वेगळे आंदोलन



लातूर: आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून दि .०१.०६.२०२० रोजी लातूर म.न.पा समोर सोशल डिस्टंसीग चे पालन करत आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी मुस्लीम विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मोहसीन खान जिल्हाध्यक्ष लातूर शेख शादुल यांनी लातूर शहर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली होती त्याचा एक भाग म्हणून आज परिषदेतर्फे हॉकर्स व्यवसाइकाना जागा उपलब्ध करू देण्यासाठी स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे पालिकेसमोर आगळे-वेगळे आंदोलन करण्यात आले.गेली तीन महिण्यापासून शहरातील ३००० हातगाडी व्यवसायिकाचा व्यवसाय बंद आहे,तो चालू करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी आज स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने महापालिकेसमोर गळ्यात भाजिपाला, कांदे बटाटे, याच्या माळा घालून आंदोलन करण्यात अले.लाॅकडाऊनच्या काळात हातगाडी व्यवसायिकाचा व्यवसाय बंद आहे.प्रत्येक गाड्यावर ७ ते ८ जणांचे कुटूंब अवलंबून आहे. प्रशासनाने यांना रितसर परवाने द्यावे रोटेशननुसार गाडे लावण्याची परवानगी द्यावी, फेरिवाला धोरणाची अमलबजावणी करावी अदी मागण्या करण्यात अल्या. परिषदेचेचे संस्थापक अध्यक्ष मोहसिन खान यांचू नेतृत्वात हे आंदोलन करण्यात अले. लाॅकडाऊनच्या दरम्यान कोणतेही आंदोलन करण्यास, मोर्चा काढण्यास बंदी असतानाही आंदोलन केले म्हणून अंदोलनकाविरोधात शिवाजी नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments