अकरावी, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात सूट द्या
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्यामार्फत उच्चतंत्रशिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांना विद्यार्थी, पालक मंच लातुर ची मागणी
लातूर:(प्रतिनिधी) विद्यार्थी पालकमंच लातुर च्या वतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिककार्य मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री लातुर यांच्या मार्फत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, उदयजी सामंत, उच्च तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना अकरावी, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात५० %सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे.
देशात व राज्यभर कोरोनाच्या थैमानामुळे लॉक डाऊन करावे लागले. जवळपास व्यापारी आस्थापने चार महिन्यापासून बंदच आहेत,अनेक छोटे मोठे व्यवसाय ठप्प आहेत. अनेक लोकांना नौकर कपातीला,वेतन कपातीला सामोरे जावे लागते आहे. हातावर पोट असणाऱ्यांचे, मजुरांचे, शेतकऱ्यांचे, आटोचालक,ठेलेवाले,गाडीवाले, टपरीवाले, रस्त्यावर व्यवसाय करून उपजीविका भागविणारे, माध्यमवर्गीय,गरीब कुटूंबीय आर्थिक संकटात सापडलेत तर अनेक कुटूंबाचे कुटूंब प्रमुख, कर्ते पुरुषांना कमी वयात अकाली मृत्यू ला सामोरे जावे लागल्याने अनेक कुटूंबासमोर"जगण्याची व जगविण्याची"फार मोठी लढाई सुरू झाली आहे. बारावी, दहावी चे निकाल जाहीर झाले, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ही निकाल जाहीर होतील व त्यानंतर नियमित विद्यापीठाचे, मुक्तविद्यापीठाचे विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनेक विद्यार्थी, पालकांना आर्थिक अडचणींतून जावे लागणार आहे किंबहुना अनेक जन आर्थिक अडचणीमुळे प्रवेशास, शिक्षणास मुकावे लागेल अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. अकरावी, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात५०%सूट देण्यात यावी अथवा दोन, तीन टप्यात शैक्षणिक शुल्क भरण्यास विद्यार्थ्यांना, पालकांना मुदत द्यावी, जेणेकरून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी तात्काळ शासन आदेश निर्गमित करावा अशी विनंती विद्यार्थी पालक मंचचे अड उदय गवारे,प्रदिपसिंह गंगणे,अड विजय जाधव,ताहेरभाई सौदागर,बालाजी पिंपळे,अड अजय कलशेट्टी,योगेश शिंदे,जमालोद्दीन मणियार रणधीर सुरवसे,जावेद मणियार,साईनाथ घोणे,महेश विजापूरे,अड सुनीत खंडागळे,दिगंबर कांबळे ,योगेश घोणे आदींनी केली आहे.
0 Comments