Latest News

6/recent/ticker-posts

बँक कर्मचाऱ्यांकडून गावात जाऊन पीक विमा भरणा चालू; शेतकऱ्यांत समाधान


केळगाव:( वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. सध्या संपूर्ण लातूर जिल्ह्यात कोविड-१९ मुळे लॉकडाऊन आहे कलम १४४ चे कडक पालन केले जात आहे.त्यात शेतकऱ्याला खरीप हंगामाचा पीकविमा भराची अडचण होत आहे.त्यासाठी कोतल शिवणी शाखेचे शाखा व्यवस्थापक बिरु काळे व गटसचिव बसवेश्वर कल्याणी यांच्या वतीने वडगाव,तुपडी या गावात स्वतः जाऊन शेतकऱ्याचा खरीपचा विमा स्वीकारत असल्यानी शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.


त्यावेळेस तुपडी कार्यकारी सोसायटीचे चेअरमन उमराव जाधव व्हाईस चेअरमन नरसिंग हंद्राळे यांनी तुपडी गावचा पीकविमा व विम्याची रक्कम दिली आहे आतापर्यंत शिवणी कोतल येथील जिल्हा मध्यवर्ती शाखेत खरीपाचा ५५ टक्के विमा भरला गेला आहे.लोकडाऊन काळात बँकेच्या वतीने पुढाकार घेऊन घरपोच सेवा देत असल्याने ग्रामस्थ शाखा व्यवस्थापक बिरु काळे यांचे अभिनंदन करत आहेत.


Post a Comment

0 Comments