Latest News

6/recent/ticker-posts

मुख्यालयी रहा अन्यथा कार्यवाही करणार; मनसेच्या इशाऱ्यानंतर तहसीलदारांचा आदेश 


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकूर तहसीलदारांना मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी मुख्यालयी राहावे अन्यथा ताळे ठोकू अश्या इशाऱ्याचे निवेदन दिले होते.तदनंतर काही कार्यालयाचे कर्मचारी कोविड पॉ जिटीव्ही आले जे लातूरहून जा ये करत होते.त्याहीवेळेस मनसे जिल्हाध्यक्ष डॉ भिकाणे यांनी फोनवर व मेलवर पत्र पाठवून याविषयी चर्चा केली व कोरोनाच्या काळात अधिकारी , कर्मचारी दररोज ये - जा करत आहेत त्यांनी मुख्यालयी च राहावे म्हणून मनसे त्यांना कार्यालयात बंद करून ताळे ठोकेल व त्या नंतरच्या परिस्थिती ला आम्ही जिम्मेदार राहणार नाही असाही इशारा दिला. त्यानंतर तातडीने तहसीलदारांनी आदेश काढत मुख्यालयी रहा अन्यथा कार्यवाहीला सामोरे जा असा स्पष्ट उल्लेख करत 


कोविड च्या महामारीमध्ये जर आपण मुख्यालयी राहत नसाल आणि शासनाचे घरभाडे उचलत असाल तर हा गुन्हा आहे त्याचबरोबर जनतेशीही धोका आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी व त्याचा अहवाल द्यावा अन्यथा मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी कार्यालयाला ताळे ठोकल्यास उत्पन्न होणाऱ्या परिस्थितीस आपण जिम्मेदार रहाल असे त्यांनी सर्व कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट लिहिले आहे.


Post a Comment

0 Comments