Latest News

6/recent/ticker-posts

अॕन्ड.रुद्रालीताई पाटील चाकुरकर व साई फाऊंडेश,रोटरी तर्फे मास्क वाटप

अॕन्ड.रुद्रालीताई पाटील चाकुरकर व साई फाऊंडेश,रोटरी तर्फे मास्क वाटप



साई फाउंडेशन लातुर सहकार्याने इको फ्रेंडली रि युजेबल मास्क वाटप


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) आज घडीला देशात कोरोना नावांच्या विषाणूने हाहाकार माजवला आहे.दिवसेंदिवस कोरोना बांधितांचा आकडा वाढतच आहे.चाकुर शहर व तालुक्यात झपाट्याने कोरोनां बांधितांचा आकडा वाढतच आहे.साई फाउंडेशन व रोटरी क्लब चाकुरच्या वतीने चाकुर शहरात ५०० मास्क वाटप करण्यात आले. अॕन्ड,रुद्रालीताई पाटील चाकुरकर यांच्या पुढाकारांने लातुर जिल्ह्यात ११,००० हजार मास्क वाटप करण्यात आले.चाकुर शहरातही वाटप झाले.  


जनतेला कोरोना होऊ नये म्हणून प्रयत्नरत असणाऱ्या आणि कोरोना रुग्णांची काळजी घेणाऱ्या कोरोना योध्याची काळजी घेत नैसर्गिक रित्या बनविलेले , पुन्हा पुन्हा वापरता येतील असे अकरा हजार मास्क साई फाऊंडेशन ने वाटप केले आहेत . 


कोरोना च्या या संकटात महसूल विभाग,पोलीस, डॉक्टर, आरोग्य सेवक, ग्राम पंचायत कर्मचारी यांनी लक्षणीय भूमिका बजावली आहे. आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांची काळजी घेणारेही कोणीतरी आहे ही भावना त्यांच्यात निर्माण व्हावी आणि त्यांनी अशाच रीतीने कार्य करत राहावे यासाठी साई फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे . यासाठी इको फ्रेंडली रि युजेबल असे मास्क वाटप केले आहेत. 


वापरा आणि फेकून द्या अशा प्रकारच्या मास्क मुळे पर्यावरणात प्रदूषण वाढत होते, तसेच अशा वापरलेल्या मास्कच्या कचऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होत आहे, यावरील उपाय हा रि युजेबल मास्क ठरत आहे.


चाकुर शहरात मास्कचे वाटप नागरिकांनासाठी रोटरी क्लब चाकुरच्या माध्यमातून करण्यात आले.यावेळी रोटरी क्लब चाकुर अध्यक्ष विकास हाळे,सचिव सुरज शेटे,शैलेश पाटील यांनी चाकुर शहरात मास्क वाटप केले.


साई फाउंडेशन लातुरच्या सामाजिक उपक्रमांचे चाकुर तालुक्यात व शहरात कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments