Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना पॉझिटिव्ह ते डिस्चार्ज मिळेपर्यंतचा अनुभव...

कोरोना पॉझिटिव्ह ते डिस्चार्ज मिळेपर्यंतचा अनुभव...



मी उमेश कांबळे मला ७ जुलैला सर्दी खोकला ताप आला होता. मी त्या रात्रीच जवळील दवाखान्यात जाऊन इन्जेक्शन व गोळ्या घेतल्या. मात्र काही प्रमाणात ताप खोकला व गळ्यात खरखर होत होती. ९ जुलैला महापौर विक्रांत भैय्या फोन करून मला स्बव टेस्ट करायच आहे. त्यानी समाजकल्याण येथे जावा असे सांगितले व मी माझा स्वब टेस्ट केला.


९ जुलै रात्री ५३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला मात्र ४२ जणांचा अहवाल प्रलंबित होता. १० जुलैला रात्री साडे अकराच्या सुमारास मनपा आरोग्य अधिकारी याचा फोन आला. तुम्ही कुठे राहता...? तुम्ही कोणत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला होतात का..? यावरून मला कळालं की माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तेवढ्यात विक्रांत भैय्याचा आला टेन्शन घेऊ नका... तुमचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे... आम्ही तुमच्या सोबत घाबरण्यासारखं काही नाही...


      मी पॉझिटिव्ह आलो कळाल्यानंतर मी पहिला फोन रात्री साडे बारा वाजता जिल्हाधिकारी जी श्रीकांत सराना केला. सर माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यावर सरानी विचारले काही symptoms आहेत का... मी मनलो सर normal ताप खोकला व गळ्यात खरखर आहे.. त्यावर सरानी मनले " टेन्शन मत ले मै कल आके मिलुगा " म्हणजे तेवढच माझ मनोबल वाढल....


    मात्र काही वेळात एरिया सील करण्यासाठी मनपाचे आरोग्य विभागाचे व एरिया सील करण्यासाठी मनपाची गाडी आली. गल्लीत गोंधळ उडाला.. पोरगं गावभर फिरतय... चौदा दिवस गल्ली सील होणार... मात्र माझ्या एरियातील लोकांना हे माहीत नसाव या परिस्थितीतून सगळ्या जायच आहे...मग रात्री एक दीड वाजता एम्बुलेंस आली व मला बॅग घेऊन गाडी बसा अस मनण्यात आल तेव्हा माझ्या एरियातील सर्व लोक छतावर अस बघत होत जस काय मी खुप मोठा गुन्हाच केलाय.... एकानेही लाबुन टेन्शन घेऊ नकोस तु लवकर ठिक होऊन येशील अस मानायला सुध्दा कोणी आल नाही... तरीही मी सगळ्यां गोष्टी दुर्लक्ष करत गाडीत बसलो व मनात विचार आला आपल्याला चार पाच दिवसापासून symptoms होते. आता कोण कोण संपर्कात आल खुप वेळ लागेल त्या पेक्षा whatsapp टेस्टला टाकाव. व मी टाकल.. आठ ते दहा दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती home Quarantine व covid टेस्ट करून घ्या...मग रात्री दोन वाजल्यापासून फोन सुरु झाले तेव्हा मी १२ नंबर येथील कोविड सेटर मध्ये होता...


११ जुलैला सकाळी सहाच्या सुमारास फेसबुकवर संतोषजी साबदे याची पोस्ट होती get well coon तेथुन आणखी फोन वाढत गेले. मी माझ्या मित्रपरिवाराला फॅमिली मेम्बरच मानतो.. सकाळी आठ वाजता काडा नाष्टा झाला नंतर घरून फोन तबियत कशी आहे. मी ठीक आहे तुम्हाला काही वेळात एम्बुलेंस मध्ये समाजकल्याण येथे नेण्यात येईल. अकरा वाजता गाडी आली व माझ्या घरातील सदस्यांना समाजकल्याण येथील Quarantine सेटर मध्ये नेण्यात आल.


 दुपारी जेवण व काडा आला जेवण झाल्यावर गोळ्या खाल्यानंतर मळमळ सुरू होऊ उलट्या झाल्या.. तेथील डॉक्टरांनी उलट्या गोळ्या व ORS दिल मात्र उलट्या काही थांबेना झाल्या. मला माहित झाल होतं कि आपण टेन्शन घेतल्याने उलट्या होत आहेत.. तेवढ्याही मी प्रत्येकाचे फोन उचलत होतो. दीपरत्न निलंगेकर भैय्यानी तेथील डॉक्टरांना याबाबत माहिती दिली व डॉक्टर महादेव शिंदे सरानीही टेन्शन घेऊ नका जेवण्यामुळे मळमळ होऊन उलट्या झाल्या असतील मी माझ्या घरून दाळ खिचडी घेऊन येतो. नाहीतर तुम्हाला आपण सिव्हील शिफ्ट करूत. तेवढ्यात वैशालीताई यादव यांनी काही वेळात ambulance येईल व तुला सिव्हील हॉस्पिटल करणार आहेत. तेवढ्या जिल्हाधिकारी जी श्रीकांत सराचा फोन आला "कहॉ पे है" मै यहॉ सिव्हील हॉस्पिटल मै हु तबियत कशी है.. मी सागितलो सर उलट्या झाल्या आहेत सिव्हील हॉस्पिटला काही येत आहे. सर मनाले मै यहॉ पेही रुका हु आजा... तीन चार उलट्या व मनात भिती असल्याने BP LOW झाला होता. मला सिव्हील मधील ISU मध्ये शिफ्ट करण्यात आल. 


मला वाटत होतं की डॉक्टर आम्हाला बघतील का नाही... सलाईन इन्जेक्शन देणार नाही... पण तेथील डॉक्टर PPT कीट मध्ये येऊन एकदम नॉर्मल पध्दतीने चेकअप करत होते.. तेव्हा वाटत ट्रिटमेंट तरी मिळत आहे. म्हणजे आता आपल्या काही नाही होणार... डॉक्टरांनी ऑक्सिजन लावल ब्लड टेस्ट करण्यात आल व हाताला चार इन्जेक्शन देण्यात आले.. व मी निवांत झोपी गेलो... 


१३ जुलैला सकाळी आठ वाजता नाष्टा व काडा आला. मी गोळ्याही खाल्या दहा वाजता पुन्हा जिल्हाधिकारी जी श्रीकांत सराचा फोन आला तबियत कशी आहे रे.. मी मनलो आता ठीक वाटत आहे... ते मनाले कुछ भी लगा तो फोन कर.. मी हो मनालो... जिल्हाधिकारी जी श्रीकांत सराना मोठ्या भावाप्रमाणे मानतो आणि तेही मला लहान भावासारख ट्रिट करतात...


महापौर विक्रांत भैय्याचा ही फोन आला टेन्शन घेऊ नका तुम्हाला काही नाही होणार भरपूर रुग्ण ठीक होऊन घरी जात आहेत. उपमहापौर चंद्रकांत बिराजदार भैय्यानी फोन सागितले घरच्याचे स्बव टेस्ट केले आहेत. मी व विक्रांत आहोत इकड घरच्याच काही टेन्शन घेऊ नकोस... पुन्हा उपजिल्हाधिकारी विजय ढगे सरांचा फोन आला ट्रिटमेंट चांगली आहे का..? तबियत कशी आहे...? डॉक्टर रुग्णाच्या जवळ येतात का मी सगळ्यां गोष्टीना हो बोललो कारण मला तेथे जाणवलच नाही की कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे.... 


१३ तारखेला रात्री मला विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय हॉस्पिटल येथे शिफ्ट करण्यात आल रात्री साडेबारा वाजता विक्रांत भैय्याचा फोन आला उमेश आईचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्याना काही symptoms नाहीत. त्याची तबियत आहे. दोन ताईचा व लहान बाळांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे त्याना उद्या घरी सोडतील.. मला सर्वात जास्त टेन्शन माझ्या दोन वर्षांच्या भाच्याच त्याचा अहवाल निगेटिव्ह आला... 


    डॉक्टर्स व नर्सेस रोज सकाळी हातात चार इन्जेक्शन दुपारी दोन तीन इन्जेक्शन व सायंकाळी चार असे पाच सहा दिवसांत कमीत कमी पन्नास इन्जेक्शन झाले... डॉक्टर दिवसातून तीन वेळेस प्लस, बीपी व आक्सीजन चेक करत होते.. आणि तेथील प्रत्येक पेशन्टला वाटत होत खरचं आम्ही पॉझिटिव्ह आहोत का कारण तेथील ट्रिटमेंट एकदम नॉर्मल पध्दतीची होती. 


१४ जुलैला पाच वाजता महापौर विक्रांत भैय्या गोजमगुंडे कोविड पॉझिटिव्ह पेशन्टला भेटायला आले भैय्याच आणि माझा मज्जाक असतोच ते डॉक्टरांना सागु लागले अजुन इन्जेक्शन वाढवा. याचे मोबाईल काढून घ्या.. तेथेही वाटल की आपल्याला काही मोठा आजार झालेला नाही. रात्री आठ सुमारास जिल्हाधिकारी जी श्रीकांत सर आले ते पण डॉक्टरांना व तेथील पेशन्टच्या तबियती विषयी विचारपुस केले. मला खास सागुण गेले आराम कर फेसबुक पे जादा मत रहते जा.. आणि त्यांनीही मम्मी पप्पाच टेन्शन घेऊ नकोस मी आहे.. 


१७ रात्री १२ नंबरला येथील कोविड सेटर मध्ये शिफ्ट केले तेथे सकाळी आठ वाजता नाष्टा व काडा पुन्हा कपालभाती प्रार्थना दुपारी दोन वाजता जेवण पाच वाजता काडा व फ्रूट मग रात्री साडे सात वाजता जेवण... दिवसातून तीन वेळेस temp. बीपी व आक्सीजन चेक जात होत... तेथे आम्ही दीडशे रुग्ण होता आणि कोरोना काही शिकल तर या पृथ्वीवर कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही. न जात मोठी आहे ना धर्म. फक्त माणसाने त्याची माणुसकी जपली पाहिजे... 


  २० जुलैला डिस्चार्ज मिळाला रात्री नऊ वाजता घराकडे जाताना त्याच एरियातील नागरिक मला विचारत होते खरचं तु पॉझिटिव्ह आहे का... 


   मला सगळ्याना एवढच सागायाच कोरोना काही मोठा आजार नाही आहे आपल्या मनाने त्यांला मोठ बनवल आहे. अहवाल पॉझिटिव्हही आला तरही आपल मन पॉझिटिव्ह ठेवा लोक काय म्हणतील.. लोक कस बघत आहेत याचा विचार करून नका... 


लोग क्या कहेंगे या लोग क्या सोचेगे... 


येबी हम ही सोचेगे तो लोग क्या सोचेगे.. 


लोगों का काम हैं और कोनको सोचने दिजीये... 


मी सर्व प्रथम सिव्हील हॉस्पिटल मधील डॉक्टर नर्सेस याचे आभार मानतो... त्यानाही फॅमिली आहे आणि अशा काळातही ते आपली सेवा बजावत आहेत.... 


तसेच जिल्हाधिकारी जी श्रीकांत सर , उपजिल्हाधिकारी विजय ढगे सर, मा महापौर विक्रांत भैय्या गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार भैय्या, सुमित्रा तोटे मॅडम, दिपरत्न निलंगेकर भैय्या, संतोषजी साबदे व जिल्हाधिकारी कार्यालयातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे मनोबल वाढवणारे दिपक सगर सर, मुंढे मॅडम, भोसले सर व माझ्या प्रत्येक मित्र परिवारचे आभार व आपल्या सर्वांचा आशिर्वाद व प्रेम माझ्यासोबत असाच राहु द्या.... 


आपलाच 


उमेश कांबळे 


होय मी कोरोनावर मात केली आहे...


Post a Comment

0 Comments