ग्रामीण भागातील कोरोना संक्रमणाचा उद्रेक " विनाशकारी " ठरू शकतो- मासूम खान
लातूर:(प्रतिनिधी) जिल्ह्यात जवळपास ६८ ते ७० % पेक्षा जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात राहतात. ग्रामीण लोकसंख्येच्या मानाने डॉक्टर, रुग्णालयातील बेड आणि वैद्यकीय उपकरणांची कमतरता नेहमीच जाणवते. कोरोना संक्रमणाचा वेग असाच कायम राहिल्यास गंभीर रुग्णावर उपचार करण्यासाठी ज्याप्रमाणे शहरी भागात खाजगी रुग्णालयाचा ताबा घेण्यात येतो, परंतु ग्रामीण भागासाठी अशा प्रकारची सुविधा तात्काळ निर्माण करण्याची गरज आहे.
तज्ञांच्या मते डॉक्टर आणि आरोग्य सुविधांची अपुरी संख्या पाहता ग्रामीण भागातील कोरोना संक्रमणाचा उद्रेक विनाशकारी ठरू शकतो.
विश्रामगृहावरील नियोजन व आढावा बैठक तर महत्वाची आहेच परंतु युद्धपातळीवर ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा व सुविधा क्षेत्रात रचनात्मक काम करण्याची गरज असल्याची चर्चा आहे. कम्युनिटी ट्रांसमिशन चा ग्रामीण भागाकडे होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य व्यवस्था मजबुत व सुधारित करण्याची गरज आहे. असे मत इशारा च्या प्रतिनिधीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार मासूम खान यांनी भीती वक्त केली.
0 Comments