कोथिंबीर भावाची घसरण झाल्याने शेतकऱ्यास आर्थिक फटका
केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील बुजरूकवाडी शिवारातील शेयकार्याने दीड एकर कोथिंबीर चे फक्त नऊ हजार रु झाल्याने त्या शेतकऱ्याला चांगलाच फटका बसला आहे सध्या कोथिंबिरीची आवक वाढल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत भाव कोसळले आहे. मागील जून महिन्यात कोथिंबीरचे भाव वाढले होते महिनाभरात भावत मोठी घसरण झाली आहे. बुजरूकवाडी येथील शेतकरी नारायण भोयबार यांनी जून महिन्यात कोथिंबीर प्रती कॅरेट ४०० रु जात होती हे बघून त्यांनी जुने मंध्ये सोयाबीनची पेरणी न करता,कोथिंबीरची पेरणी केली त्याची वेळोवेळी जैविक फवारणी व खुरपणी केली कोथिंबीर काढणीला आली आहे.जून मधील ४०० रु प्रति कॅरेट चा भाव सध्या १०० रु प्रति कॅरेट झाला होता.
१४ जुलै रोजी १०० रु भाव होता १५ ला लातुरात लॉकडाऊन सुरू झाले तेच शेतकऱ्याचे प्रती कॅरेटचे भाव ६० रु ला आल्याने नारायण भोयबार सारखे तालुक्यातील अनेक कोथिंबीर उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहे.
लॉकडाऊनच्या एक दिवस अगोदर १०० रु कॅरेटने जाणारी कोथिंबीर चक्क ६० रु कॅरेट ने जात असल्याने दीड एकर मध्ये १ लाखाची अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरात निराशा पडली आहे.
मृगाच्या पावसावर मी दीड एकर कोथिंबीर पेरणी केली काढणीला येई पर्यंत ४० हजार खर्च झाला एक लाख उत्पन्न निघल अशी अपेक्षा होती परंतु ६० रु प्रति कॅरेट प्रमाणे नऊ हजार झाले असे ईश्वराच्या प्रतिनिधीशी बोलताना शेतकरी नारायण भोयबार यांनी माहिती दिली.
0 Comments