Latest News

6/recent/ticker-posts

एकाच आठवड्यात एम.पी.एसी.सी.च्या दोन पदावर निवड

एकाच आठवड्यात एम.पी.एसी.सी.च्या दोन पदावर निवड



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालात करीम पठाण राज्यात तिसरा 


चाकुर:(ता.प्र.(सलीमभाई तांबोळी):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगा च्या वतीने विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेत चाकुर तालुक्यातील डोंग्रज येथील करीम बिस्मिल्लाखाँ पठाण याने दुस-यांदा बाजी मारली असुन विक्रीकर विभागातील कर सहाय्यक या पदासाठी निवड झाली आहे, निकाल गेल्याच आठवड्यात जाहीर झालेल्या टंकलेखन परिक्षेत आर्थिक दुर्बल घटक प्रवगातुन राज्यात मुलात पहिला आला होता तर या आठवड्यात मंगळवारी जाहीर झालेल्या अंतिम निकालात सुध्दा दैदीप्यमान यश संपादक केले असुन स्पर्धा परिक्षेत विध्यार्थी समोर आदर्श निर्माण केला. याबाबत सविस्तर माहिती अशी की मराठवाड्यातील लातुर जिल्हा चाकुर ता.डोंग्रज या डोंगरावर गाव वसलेले असुन पठाण करीम बिस्मिल्लाखाँ यांने अत्यंत प्रतीकुल परिस्थिती वर मात करून यश प्राप्त केले शालेय शिक्षण पहिली ते सातवी डोंग्रज येथे तर आठवी ते दहावी निर्मलपुरी हेर अकरावी व बारावी शिवाजी विद्यालय उदगीर तर पदवी रायगड जिल्ह्यात केली कोणत्याही परिस्थितीत शिक्षण हस्तगत करण्यासाठी त्यांनी जिद्दीनं यश संपादन केले वडील हे हातगाड्यावर फळे विकुन घर प्रपंच चालवत तर आई मोलमजुरी करते दोन भाऊ मोठा मजुरी करतो तर लहान हा आयटी ऊत्तीर्ण झाला कीमान तीन एक्कर शेती त्यातील एक एक्कर विकुन पठाण करीम ला शिक्षणासाठी खर्च केले.


 दोन बहीणी आहेत खानदानात कोणीही शिकलेले नाहीत कोणताही वारसा नसतांना स्व:ताच्या बळावर ध्येय गाढले असुन त्याच्या या यशस्वी यश संपादन केल्याने राज्यभरात कौतुक होत आहे.


आपले आई वडील कष्टाने आपल्या शिवत आहेत.महाराष्ट्र लोकसेवाअयोगाची पहिली परिक्षा २०१७ वर्षात दिली.पहिला प्रयत्न पुर्व परिक्षा अपयश आले.त्यानंतर दुसरा प्रयत्न केला.त्यात पुर्व मुख्य दोन्ही पास मंञालय क्लर्क,कर सहाय्यक दोन्ही पदावर निवड झाली.आमच्या प्रतिनिधी त्यांच्याशी दुरध्वनी वर संपर्क साधुन त्यांचे मनोगत विचारले असता.ते म्हणाले की शिक्षणांची आवड लहान वयापासुनच होती.ग्रामीण भाग असल्यामुळे शिक्षण घेण्यासाठी परिश्रम घेतले.घराच्याचीही परिस्थितीत हालाक्याची असल्यामुळे शिक्षण घेऊन नौकरी मिळवल्या शिवाय दुसरा उद्देशच डोळ्यासमोर नव्हता.अभ्यासात सातत्या चिकांटी व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला व हे यश मिळाले.माझ्या यशाचे श्रेय माझे आई वडील,माझे गुरुजन,माझ्या आयुष्यत मला ज्यांनी पाठबळ दिले.ते सर्व माझे मिञपरिवारयांना जातो.


ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा आपले यश मिळवु शकतो.पण त्यासाठी सतत मेहनत अभ्यास करण्यांची आवड आसली पाहिजे असे ते म्हणाले.त्यांच्या यांच्या यशाबदल सर्वच स्तरांतुन अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.


Post a Comment

0 Comments