Latest News

6/recent/ticker-posts

पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा निकाल शंभर टक्के



औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख) दि. ३० तालुक्यातील याकतपुर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा निकाल १००% टक्के लागला आहे. 


तालुक्यातील ही शाळा नवीन उपक्रम राबवण्यात मध्ये अग्रगण्य असल्याची चर्चा पूर्ण तालुक्यात आहे शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी शंभर टक्के निकाल ठेवला आहे


परीक्षेत एकूण ६० विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादन केले. आहे.


 गवळी वैभव विजयकुमार ९७% घेऊन प्रथम आला. तर इंजे सन्मती शरद या मुलीने ९६.६०% घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला तर तृतीय जाधव मयुरी रामदास हिने ९५.२०%घेतले. परीक्षेस प्रविष्ठ- ६० पैकी ९० टक्‍क्‍यांच्या पुढे-११ यामध्ये विशेष प्राविण्यासह - ४६ प्रथम श्रेणी - ९ द्वितीय श्रेणी -५ सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉक्टर अफसर शेख, संस्था अध्यक्ष संजय कुलकर्णी, मुख्याध्यापक पटेल ए. आर व शाळेतील सर्व शिक्षका तर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


Post a Comment

0 Comments