अल-अमीन विद्यालयाने यशाची परंपरा राखत शंभर टक्के निकाल दिला
उदगीर:(प्रतिनिधी) विभागीय मंडळातर्फे मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज घोषित झाला. जिल्ह्यात उर्दू माध्यमाची नावाजलेली शाळा म्हणून ओळखली जाते. दरवर्षी या विद्यालयाने उज्वल निकालाचा ठसा उमटविला आहे. विद्यालयातून १४२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी तीन विद्यार्थी ९० पेक्षा जास्त टक्केवारी घेऊन गुणवंत होण्याचा मान मिळविला आहे ५१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत ६० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ३ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. अशाप्रकारे विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विशेष म्हणजे यावर्षीचा विद्यालयाचा बारावीचा निकालही शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी गोलंदाज कुबरा हबीब ९४.८०, चौधरी तजिन आजम ९३.४०, परकोटे यामीन अब्दुल सलिम ९०.८०, लद्दाफ़ समरा अमजद ८९.००, दायमी सक़लैन मुशफ्फीक़ ८९.०० गुण मिळवून विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला. विद्यालयाच्या या यशात विद्यार्थ्यांच्या कष्टा बरोबरच मुख्याध्यापक शिक्षक व संस्थेच्या मार्गदर्शनाचाही मोठा वाटा आहे. या यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर ईसा खान, सचीव शेख अकबर, इतर पदाधिकारी, मुख्याध्यापक उस्ताद सय्यद सलीम व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले व उज्वल भविष्यासाठी शुभकामना दिली.
0 Comments