Latest News

6/recent/ticker-posts

शाहु विद्यालयाची उज्जवल निकालाची परपरंपरा कायम

शाहु विद्यालयाची उज्जवल निकालाची परपरंपरा कायम



 निटुर:(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेबु/मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत छत्रपती शाहू विद्यालय,निटूर या शाळेचा ईयत्ता १० वी चा निकाल ९१.९०% लागला आहे.या विद्यालयतुन १९ विद्यार्थी विशेष प्राविण्यत उत्तीर्ण झाले, ८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झाले आहेत या विद्यालयने निकालाची यशश्वी परंपरा कायम राखत केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे त्यात कु.शिवणे स्वाती निळकंट ९४.८० %( केंद्रात प्रथम), कु.चव्हाण स्नेहा बाळू ९१.६०%( द्वितीय ),कु.सोमवंशी स्नेहा पुंडलिक ९०.४०%(तृतीय ) क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भगवानसिंह बायास गुरुजी,सचिव आ.बाबासाहेब पाटील साहेब,मुख्याध्यापक सोमवंशी अनिल,जाधव डि.आर ,बाचीफळे ,अावाळे ,सुर्यवंशी,गिरी ,जाधव मॅडम,प्रा.संतोष सोमवंशी, प्रा.अमोल आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी आभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments