लातूर:(प्रतिनिधी) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएस ई च्या वतीने घेण्यात आलेल्या सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून दहावी बोर्ड परीक्षेमध्ये किडीज इन्फो पार्क इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. पहिल्याच वर्षी स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. किडीज इन्फो पार्क शाळेतील 47 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती . त्यापैकी मानसी आपेट 97.60 टक्के , रिया चांडक 96.80 टक्के, तनिष्क जाधव 95. 20 टक्के, कृतिका राजमाने 95 टक्के, श्रेयश वाडीकर 94.80 टक्के , कैवल्य देशमुख 94. 40%, ऋतुजा कठाडे 94.40 टक्के, देवेश तोष्णीवाल 94.20 टक्के , प्रिती भोसले 94.30 टक्के , तन्मय कोंडेकर 93.40%, जगजीत भोसले 92.80 टक्के , शुभम भुतडा 92.40 टक्के, मोहम्मद कफील खान 92 टक्के , नंदिनी हेगडे 91. 80 टक्के , साईराम परदेशी 90.60 टक्के ,यशस्वी थोरमोटे 90.40 टक्के, स्नेहा पाटील 90. 40 टक्के, स्वरूप पिचारे 90.40 टक्के, मंगेश लाटे 90.40 टक्के ,राजदीप देशमुख 90.20 टक्के, श्रेया पांचाळ 90.20 टक्के, वेदिका राजमाने 90 .00 टक्के या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे . स्कूल मधील गणित विषयात 100 पैकी 100 गुण दोन विद्यार्थ्यांनी तसेच मराठी विषयात दोन विदयार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष देवांग शाह सर प्राचार्या प्रीती शाह मॅम , शिक्षक, शिक्षकेतर , कर्मचाऱ्यांनी कौतुक ,अभिनंदन केले आहे.
0 Comments