Latest News

6/recent/ticker-posts

औसा नगराध्यक्ष शहरात वाटप करणार मोफत मालेगावी मन्सुरी काढा किट


औसा नगराध्यक्ष शहरात वाटप करणार मोफत मालेगावी मन्सुरी काढा किट


औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख) दि.२९ - लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यात कोरोना चा कहर वाढला आहे या वाढत्या आजाराला पाहून येथील नगराध्यक्ष शेख अफसर यानी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध झालेले मालेगावचे मंसुरी काढा मोफत वाटप करणार आहेत. एक वेळ अशी होती औसा शहरामध्ये कोरोणाचा एकही रुग्ण नव्हता त्या वेळेला मात्र अफसर शेख यांनी लॉक डाऊन मध्ये असलेल्या लोकांना त्यांच्या घरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला होता. मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे सर्व गोरगरीब लोकांची यादी काढून हे काम त्यांनी शांत पद्धतीने कसलीही चमकोगिरी न करता केले होते. त्यांच्या या कामाकडे पाहून अनेक संस्थांनी त्यांना "कोरोना योद्धा" हा पुरस्कार देखील दिला आहे. मागील काही दिवसापासून मालेगाव येथील प्रसिद्ध असलेला काढा चर्चेचा विषय बनला होता मालेगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या नसल्यात जमा झाली होती याचे कारण मंसुरी काढा होय. तो काढा आपल्या शहरांमध्ये वापरावा अशी मागणी स्थानिक जनतेतुन वेगवेगळ्या माध्यमातून नगराध्यक्ष यांच्याकडे केली होती. या मागणीचा विचार करून नगराध्यक्ष अफसर शेख यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून सांगितले की संपूर्ण शहरांमध्ये अफसर शेख युवामंच मार्फत हा काढा घरोघरी मोफत वाटप केला जाईल.वाढती रुग्ण संख्या पाहून लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांमधून स्वागत होत आहे व त्यांचे अभिनंदनही केले जात आहे.


Post a Comment

0 Comments