Latest News

6/recent/ticker-posts

उस्मानिया उर्दू हायस्कूलची उज्वल निकालाची परंपरा कायम


उस्मानिया उर्दू हायस्कूलची उज्वल निकालाची परंपरा कायम


अहमदपूर:(बी.जे.शेख) दि. ३० तालुक्यातील अहमदपूर तालुक्यातील काळेगाव रोडवर स्थिती उस्मानिया उर्दू हायस्कूल चा निकाल ९६% इतका लागला. मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत या हायस्कूल ची बागवान सना ताजुद्दीन या मुलीने ८०.२०% गुण घेऊन प्रथम आली तर बागवान नुसरत ईस्माईल ७४.८०% द्वितीय ठरली व कासार अरशद जाकेर तृतीय ठरला. अहमदपूर तालुक्यातील ही शाळा उर्दू माध्यमाचे उत्कृष्ट शाळा ठरली. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली.परीक्षेत एकूण २८ विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर आठ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष गुलाम मोहम्मद वस्तानवी व मदरशाचे नाजीम मौलाना युसुफ ईशाती आणि शाळेचे मुख्याध्यापक शेख वाहब हमीद व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments