Latest News

6/recent/ticker-posts

माजी सैनिक गजेंद्र स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला आर्थिक मदत   

माजी सैनिक गजेंद्र स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला आर्थिक मदत 



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) आज राज्यात कोरोना सारखं महाभयंकर संकट आहे त्यामुळे आपणही समाजाचे काही देणे लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून चाकुर तालुका माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष गजेंद्र बाबय्या स्वामी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी चाकूर येथील कोविड केअर सेंटरला आर्थिक मदत केली असून,चाकुर तालुक्यातील कोरोना बाधितांच्या उपचारांसाठी मदत करावी म्हणून वाढदिवसाचे निमित्त साधुन त्यांनी कोविड सेंटरला आर्थिक मदत केली.समाज उपयोगी काम केल्यामुळे त्यांचा चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत होते.चाकुर तालुक्यात कोरोनांने बांधित होणाऱ्या रुग्णांवर चाकुर येथे उपचार होत आहेत.उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांनी येथील सुविधे बदल समाधान व्यक्त केले आहेत.चाकुर तालुक्याचे तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवेयांनी समाजातील दानशुर व्यक्तीना मदतीचे आहवान केले होते.त्यांना केलेल्या आहवानांस प्रतिसाद देत अनेक लोकांनी मदत केली आहे.चाकुर तालुक्यातील कोविड केंअर सेटर मध्ये उपचार करुन घेणाऱ्या कोरोना बांधितांना अडचण होणार नाही.यांची दक्षता घेतली जात आहे. दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वातंञ्य दिनाच्या निमित्ताने ती मदत त्यांनी चाकुर तालुक्याचे तहसीलदार डॉ शिवानंद बिडवे यांच्याकडे सुपूर्द केली, यावेळी पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, नायब तहसीलदार बालाजी चितळे,माजी सैनिक वसंत वाघमारे सह विविध अधिकारी उपस्थित होते. आपल्या वाढदिवसांच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या आर्थिक मदतीची चाकुर तालुक्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments