क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात
सोशियल अंतर ठेऊनच ध्वजारोहन
अहमदपूर: तळेगाव दि.१५ ऑगस्ट, क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७४ वा स्वातंत्र्य दिन सोशियल अंतर ठेऊनच साजरा करण्यात आला. शाळेचे प्राचार्य राजेश यादव यांच्या हस्ते, असिस्टंट डायरेक्टर महेंद्र पांडे, रामरावजी मद्देवाड, यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहण करताना कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करून सुरक्षित अंतर ठेऊनच कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी मोजकेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना बोलवण्यात आले होते. मात्र विद्यार्थी, पालक व उर्वरित शिक्षक नसल्याची उणीव वेळोवेळी भासत होती. महेंद्र पांडे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाची महती सांगितली. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी शाळेचे कोऑर्डीनेटर संगमेश्वर ढगे, सुधाकर केसगिरे, गोविंद वलसे, सूर्यकांत गोरे, मनोज डीगे, मनोज गायकवाड, मनोज घेरे, राहुल तिवारी, शिवा नारिपल्ली, अंजली मद्देवाड, अलीसाया सर, तुकाराम चोले, वाचमन कांबळे, गायकवाड आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रम यशस्वी पार पडला.
0 Comments