Latest News

6/recent/ticker-posts

गंगापुर येथे ग्रामसभा झुम ॲप वर संपन्न

गंगापुर येथे ग्रामसभा झुम ॲप वर संपन्न



लातूर:(प्रतिनिधी) दि. १५ - गंगापुर येथे ग्रामसभा झुम ॲपवर सरपंच बाबु खंदाडे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. एकुण १४७ लोकांनी सहभाग घेतला. ग्रामसभा झुम ॲपवर घेणारी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पाहिलीच ग्रामपंचायत असुन यातुन नागरिकांच्या तक्रारी, सुचना, ठराव, नवीन कामांची मंजुरी घेण्यात आली. कोरोना विषयावर उपाययोजना याची माहिती दिली व नागरिकांकडुन सुचना ही प्राप्त केल्या. याप्रसंगी सरपंच बाबु खंदाडे, ग्रामविकास अधिकारी परचंडराव, उपसरपंच रफीक शेख, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर शेलार,भाऊसाहेब मिंड, तलाठी गोरे आदिजण प्रशासनाच्या वतीने उपस्थित होते. गावातील नागरिकांनी तक्रारी, सुचना, ठराव, नवीन कामांची मंजुरी व माहिती देण्यात आली, विशेषत गावातील रहीवाशी व तसेच व्यवसाय नोकरी निमित्त स्थायिक अश्या अबुधाबी, बेंगलोर, पुणे या ठिकाना वरुन नागरिकांनी संपर्क गंगापुर ग्रामपंचायतशी संपर्क साधला. अश्या प्रकारे ग्रामसभा झुम ॲपवर घेतल्यामुळे नांगरिकानी आनंद व समाधान व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments