मराठवाडा विकास मंडळांना मुदतवाढ द्या; अहमदपूर येथे धरणे निदर्शने अंदोलन
अहमदपूर:(प्रतिनिधी) दि. १५ - मराठवाडा विकास महामंडळा सह इतर विकास महामंडळाला शासनाने मुदतवाढ देण्यात यावी या मागणीसाठी मराठवाडा जनता विकास परिषद तालूका शाखा अहमदपूर च्या वतीने येथील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे व निदर्शने अंदोलन करण्यात आले. येथील उपजिल्हाधिकारी यांच्या कडे देण्यात आलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की, मराठवाड्यातील बहुतांश आमदार-खासदार यांनी मुख्यमंत्री आणी राज्यपालांना निवेदन देवून विकास मंडळाला मूदथ वाढ देण्याची मागणी केली आहे.मात्र शासनानाने अद्यापपर्यंत निर्णय घेतला नाही.म्हणून आज दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजी मराठवाडा जनता विकास परिषद तर्फे मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता त्या नूसार आज धरणे व निदर्शने अंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. शासन राजकीय कारणांमुळे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या दबावाखाली मराठवाडा व विदर्भाच्या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली करत आहे या भागाच्या विकासाकडे कानाडोळा करत आहे अशी या भागातील जनता लोकप्रतिनिधींची भावना होत.सध्या या विकास मंडळांना मुदतवाढीच्या मागणी बाबत होत असलेल्या दिरंगाईचा आम्ही निषेध करीत आहोत असेही मराठवाडा जनता विकास परिषदेने आपल्या पत्रकात म्हटले आहे.या मागणीसाठी अहमदपूर तालुका शाखेच्या वतीने शारीरिक अंतर पाळत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर मराठवाडा जनता विकास परिषदेचे सचिव डाॅ.सिध्दार्थकूमार सूर्यवंशी, नगरसेवक सय्यद ताजोद्दीन, सामाजिक कार्यकर्ते शेख अय्याजभाई,पत्रकार बासीदखान पठाण,गफारखान पठाण,अजय भालेराव,मेघराज गायकवाड, गोविंदराव काळे,शेख जिलानी, सय्यद याखूब,सचिन बानाटे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
0 Comments