Latest News

6/recent/ticker-posts

राजा-सर्जावर कोरोनाचे सावट; कोरोनामुळे पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पौळा साधेपणाने साजरा

राजा-सर्जावर कोरोनाचे सावट; कोरोनामुळे पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पौळा साधेपणाने साजरा



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) यंदा सर्वच सणावर कोरोनाचे सावट असुन शेतकरी आपला बैलपौळा सण साध्य पध्दतीने साजरा करण्यात आला.चाकुर तालुक्यात व शहरामध्ये पौळा सण अगदी साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.शेतकऱ्यांनी आपल्या राजा -सर्जाची पुजा शेतामध्येच करुन सण साजरा केला. गावात आपले राजा-सर्जा फिरवले नाहीत.साधेपणाने पौळा साजरा केला. संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट घोंगावत असून सर्व सण महोत्सवाला याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचा पोळा सणांवर देखील कोरोनाचं सावट असून लातुर जिल्ह्यात पोळाला जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. मात्र आपल्या सर्जाराजा बैलांची विधीवत पूजा त्याला सजवून आपल्या घरीच पोळा सण साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर यंदा आली आहे. पोळा हा आपल्या कृषीप्रधान देशातील व मराठी संस्कृतीतील महत्वाचा सण आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतचं असल्याने, दक्षता म्हणून सार्वजनिक सुरक्षितता जपण्यासाठी शेतकरी बांधवांनी, सामूहिक पूजन न करता घरी, शेतशिवारातच पोळा साजरा करा असे आवाहन लातुर जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे, वर्षभर शेतात राबराब राबणारा शेतकरी आणि त्याची राजा-सर्जाची जोड म्हणजेच" बैलजोडी यांचं अतूट नातं आहे. जसं आई-वडिलांना त्यांची लेकरं असतात; तशीच शेतकऱ्याला त्यांची बैलं जिवापाड असतात. शेतकऱ्यांचा खरा साथी सोबती म्हणून त्याची बैलं कायम त्याच्यासोबत असतात. सकाळपासून आपल्या बैलाला आंघोळ घालून सजवून बैलाला सजवण्यात शेतकरी व्यस्त होता.व बैलपौळा सण आपला आपल्या पध्दतीने घरातच साजरा केला.


Post a Comment

0 Comments