Latest News

6/recent/ticker-posts

कौतुकास्पद: जिल्हाधिकार्‍यांच्या पत्नीची शासकीय रुग्णालयात प्रसूती

जिल्हाधिकार्‍यांच्या पत्नीची शासकीय रुग्णालयात प्रसूती



नांदेड:(प्रतिनिधी) शहरातील शासकीय महिला रूग्णालय हे १०० खाटांचे सुसज्ज व तज्ज्ञ डॉक्टर उपचारासाठी उपलब्ध असताना इतर ठिकाणी जायची गरजच काय? असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय महिला रूग्णालयात उपचारासह प्रसूतीसाठीही पत्नीला दाखल करीत वेगळा आदर्श घालून दिला. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती बिकट असल्याने जिल्हाधिकाऱ्यांवर सध्या कामाचा प्रचंड ताण आहे. अशा काळात पत्नीची काळजी घेत सरकारी दवाखान्याची निवड करत जिल्हाधिकाऱ्याने कुठलाही बडेजाव खडा न करता नांदेड येथील शासकीय महिला रुग्णालयात आपल्या सौभाग्यवतीला ऍडमिट करून त्याच ठिकाणी प्रसूती करण्यास सांगितल्यामुळे शासकीय रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळू शकतात असे जणू काही हे प्रयत्न देत त्याच रुग्णालयात त्यांच्या सौभाग्यवतीने कन्येला जन्म दिला.खासगी हॉस्पिटल्सच्या सर्व सोयी नाकारत जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी व्यवस्थेवर विश्वास दाखविल्याने डॉक्टरही भारावून गेले आहेत. खाजगी रुग्णालयाऐवजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्नीला प्रसूतीसाठी श्यामनगरच्या महिला सरकारी दवाखान्यात दाखल केले. याच सरकारी रुग्णालयात सरकारी डॉक्टर आणि सरकारी परीचारिकांनी प्रसूती केली. सरकारी रुग्णालयात देखील सर्व सोयी आहेत. इथे देखील उत्तम उपचार मिळतात हेच दाखवून देत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एक नवा आदर्श घालून दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून त्यांचे कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments