चाकूर तालुक्यात जागर अस्मिता या मोहिमेचा प्रारंभ
चाकूर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन, अस्मिता प्लस या योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी दिनांक १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात ही मोहीम राबवण्यात येत आहे. चाकूर तालुक्यातील ही मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेचा आरंभ चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथे दिनांक १५ ऑगस्ट रोजी झाला या अभियानाचा शुभारंभ अभियानाचे महादेव शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. आनंदवाडी येथील उमेद अंतर्गत स्थापन केलेल्या स्वयंसहायता समूहातील महिलांना सॅनेटरी नॅपकिन चा वापर करणे आजच्या काळाची गरज असून याचे महत्त्व आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे याबाबत उपस्थित महिलांना ग्रामपंचायत सभाग्रहात कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच आनंदी महिला ग्राम संघाच्या अध्यक्ष लताताई आरदवाड व सचिव रुपाताई आरदवाड यांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेत समारोप उपस्थित महिला समवेत गावांमध्ये प्रभातफेरी काढून करण्यात आली यावेळी तालुका व्यवस्थापक दराडे एस एम शुभम आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रभाग समन्वयक कोंपले रिंकू यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समुदाय संसाधन व्यक्ती मेकलेवाड सुनीता यांनी मानले.
0 Comments