महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा केंद्र प्रत्येक जिल्ह्यात द्यावीत- आमदार बाबासाहेब पाटील
चाकूर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २० सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. त्यासंदर्भात आयोगाने १४ ऑगस्ट रोजी एक परिपत्रक जारी केले असून, त्यात परिपत्रकाबाबत लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आक्षेप आहे.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थी आपापल्या गावी आहेत. त्यामुळे जेव्हा ते पुणे किंवा अनेक ठिकाणी होते तेव्हा त्यांनी ती केंद्र निवडली होती परंतु ते आता गावाकडे असल्यामुळे व जिल्हा बंदी असल्या कारणाने विद्यार्थ्यांच्या प्रवासावर काही निर्बंध आहेत. यामुळे लातूर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे आपण लातूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्राबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आदेश द्यावेत अशी विनंती अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
0 Comments