Latest News

6/recent/ticker-posts

चाकुर गटविकास अधिकाऱ्यांनी मागाविले मुख्यालयी राहण्याचे पुरावे; मनसेच्या आंदोलनांचे फलित

चाकुर गटविकास अधिकाऱ्यांनी मागाविले मुख्यालयी राहण्याचे पुरावे; मनसेच्या आंदोलनांचे फलित



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) मनसे ने तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील कर्मचारी मुख्यालयी राहावे म्हणून वेळोवेळी निवेदन देऊन अधिकार व कर्मचाऱ्यांना सतर्क केले होते.मनसे स्टाईल आंदोलनांचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंग भिकाने करीत आहेत.अचानक एके दिवशी चाकुर पंचायत समिती मध्ये सकाळी जाऊन उपस्थित कर्मचारी यांची माहिती घेतली असता.७२ कर्मचाऱ्यांन पैकी ४२ कर्मचारी हजर नव्हते याचा पंचनाम केला. चाकुर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यलयी राहण्यांचे पुरावे मागवणारा आदेश नुकताच काढला असुन मनसे जिल्हाअध्यक्ष डॉ,नरसिंग भिकाने यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनांचे हे फलित समजले जाते.


मागच्या शुक्रवारी केलेला हा आदेश असे म्हणतो की तालुक्यातील शासकीय अधिकार व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत.त्यांची खातरजमा करुन त्यांच्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलाम ५६ नुसार तसेच साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ मधील तरतुदी नुसार कारवाई करावी लागेल.त्यामुळेच चाकुरचे गटशिक्षणधिकारी,आरोग्य अधिकार,पशुधन विकास अधिकारी,बांधकाम उपआभियंता,बालविकास प्रकल्पधिकारी,आदि अधिकाऱ्यांनी आपआपल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुर्ण पत्ते व घरभाडे भत्याची पावती घेऊन माहित सादर करायचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले.जे कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत त्यांच्या वर कारवाई करावी असेही हा आदेश आहे.


Post a Comment

0 Comments