चाकुर पोलीस स्टेशनच्या वतीने महारक्तदान शिबिरांचे आयोजन
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्यात थैमान माजवले आहे.दिवसेंदिवस कोरोनांचे रुग्ण वाढतच आहेत.कोरोना रुग्णांना रक्त कमी पडु नये म्हणून त्यांच्या उपचारांमध्ये कसर राहु नये व रक्त पुरवठा कमी पडु नये या उदांत हेतुने चाकुर पोलीस स्टेशच्या वतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन उद्या दि.२७/८/२०२० वार गुरुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरांस पोलीस आधीक्षक लातुर राजेंद्र माने,अप्पर पोलीस अधीक्षक लातुर हिंमत जाधव,पोलीस उपअधीक्षक चाकुर विद्यानंद काळे,तहसिदार शिवानंद बिडवे उपस्थिती रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे.
रक्तदान शिबिरांचे प्रमुख आयोजक चाकुर पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण आहेत.ते म्हणाले की या रक्तदान शिबिरांमध्ये जास्तीत जास्त युककांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यामध्ये आपले योगदान घ्यावे असे आव्हान पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण यांनी केले.
साहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड,उपोनि ञ्यंबक गायकवाड,उपोनि.खंडु दर्शने,उपोनि निलम घोरपडे,पोहेकॉ रामचंद्र गुडरे,बाळु आरदवाड,तानाजी आरदवाड, आदिच्या परिश्रमांतुन शिबिरांचे आयोजन होणार आहे.
0 Comments