हृदयविकाराच्या झटक्याने आडे सरांचे दुःखद निधन
केळगाव:(प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील झरी गावचे शिवाजी प्राथमिक आश्रम शाळा केळगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक भानुदास किसनराव नाईक (आडे )सर वय ५९ वर्ष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निलंगा येथे दुःखद निधन झाले आहे उद्या गुरुवारी उद्या सकाळी त्यांच्या झरी या मूळ गावी अंतीमसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी ३ मुले असा परिवार आहे. अतिशय संयमी ,मितभाषी व नम्र स्वभाव असणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या दुःखद जाण्याने केळगाव,झरी गावावर शोककळा पसरली आहे.
0 Comments