अभिमन्यूनीं विरोधकांचे कु़ंपण भेदत औश्याच्या विकासात रोवला मानाचा तुरा, नवे बसस्थानक
औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख)दि. २७ - औसा तालुका तसा विकासापासून वंचित राहिलेला तालुका आहे.
ज्यांची सत्ता आहे त्यांच्या विरोधातील व्यक्ती या ठिकाणी आमदार झाल्याचा आत्तापर्यंत इतिहास राहिला आहे. यापूर्वीच्या आमदारांनी याठिकाणी बरीचशी विकास कामे केली. तशाच पद्धतीची विकास कामे विद्यमान आमदार करात आहेत. शहरात एकच बस स्थानक आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या या बस स्थानकत क्वचित येतात.या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांनी नवीन बसस्थानका साठी एक वेगळा निधी मंजूर करून घेतला. मात्र काही स्थानिक नेत्यांनी या कामाला विरोध दर्शवला विरोध यासाठी होता कि गावांमधील जी बाजारपेठ आहे त्याचे महत्त्व कमी होईल. अनेकांनी या विषयाला पाठिंबा देखील दिला. मात्र बहुसंख्य लोक या मताचे होते की लांब पल्ल्याच्या गाड्या शहरात येण्यासाठी नवीन बस स्थानक होणे आवश्यक आहे. काहींनी विरोध दर्शवला परंतु बरेच जण विकासाच्या बाजूने राहिल्याने आमदार यांना पाठबळ मिळाले व त्यांनी नवीन बस स्थानकाच्या कामाची मंजुरी घेऊन कामाला सुरुवात केली.
जवळपास एक ते दीड महिन्यापूर्वी कामाला सुरुवात झाली होती आज ते काम ४०% पूर्ण झाल्याची दिसून येत आहे. विरोधकांना न जुमानता आमदारांनी केलेल्या या कामाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
0 Comments