मुळात मार्शल आर्ट च्या विषयी खुप कमी लिहलं जात मार्शल आर्ट मध्ये ज्यांचं खूप मोलाचा योगदान असलेले सी.ए. तांबोळी सरांच्या लेखणीतून...
मार्शल आर्ट...युद्धाचा खेळ
मार्शल आर्ट मध्ये कराटे तायक्वांडो इत्यादी हे सर्व युद्धाचे प्रकार आहेत यामध्ये अभ्यास करत असताना प्रशिक्षार्थी आपल्या वैयक्तिक गुणांचा वापर करून या खेळामध्ये नाविन्यपूर्ण विविध प्रकारच्या शैलीचे निर्माण करू शकतो, ज्यास आपण टेक्निक मध्ये संशोधन करून नवीन संशोधन करत असतो, खेळ किंवा कला कधीच पूर्ण होत नाही खेळामध्ये आणि कलेमध्ये नवीन नवीन टेक्निक ची निर्मिती व खेळाचे नियम अशा अनेक प्रकारचे बदल सारखे होत राहतात, तेव्हाच कुठे त्या कलेला किंवा खेळायला महत्त्व प्राप्त होत जाते.
मानव समाजाच्या दृष्टिकोनातून आजच्या युगामध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता आहे अशा सर्व गोष्टींचा अवलंब करून आजच्या परिस्थितीला अनुसरून शास्त्रीय दृष्टीकोन असेल, त्यामध्ये वैयक्तिक सुरक्षेचा भाग असेल या सर्वांच्या विचाराचा एकत्रित समूह करून खेळामध्ये तो कुठलाही खेळ असू द्या त्यामध्ये बदल हे निश्चित केले जात असतात त्या बदलांचा बाऊ करण्याची गरज नसते, त्याची भीती मनात बाळगण्याची गरज नसते कारण ही बदलण्याची प्रक्रिया सारखी होत असते जे बदलत नाहीत त्यांना गती मिळत नाही आणि जे सारखे बदलत असतात म्हणून एका विशिष्ट अशा ठिकाणापर्यंत पोहोचण्याची पात्रता ठेवतात व गतीमान होतात.
बहुतांश वेळेस यश सगळ्यांनाच मिळतेच असे नाही किंवा सगळ्यांनाच ऑलिंपिकचा दर्जा मिळतो असं नाही, पण एक गोष्ट निश्चित होते त्याच्या मूळ स्वरूपामध्ये बदल न होता ती गोष्ट शेकडो वर्षापासून सातत्याने मांडत मांडत त्याच्यावरती अभ्यास करत कुठेतरी एका विशिष्ट दर्जाला ती पोहोचत असते, म्हणूनच आपण असे म्हणतो की बदल हा प्रकृति चा नियम आहे.
रोज दिवस बदलत असतो त्याच पृथ्वीवरती तोच सूर्य परत परत येतो रोज सूर्योदय होत असतो, रोज सूर्यास्त पण होतो पण तो प्रत्येक दिवस हा नवीन असतो आणि त्या प्रत्येक नवीन दिवसाची पहाट ही नवीन असते सकाळ नवीन असते दुपार नवीन असते संध्याकाळ नवीन असते आणि रात्र सुद्धा नवीन असते तेव्हा त्या गोष्टी आपण करत असतो तरी त्याची दररोज प्रक्रिया वेगळी असते म्हणजे सुद्धा त्याच पद्धतीने तोच खेळ आपण सर्वांनी रोज खेळत रहा तर त्याच्या मधल्या अनुभूती मध्ये त्या खेळांमध्ये खेळल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये हे नवीन बदल होत असतात आणि त्याला ते करणे त्याबद्दल त्याचा अंगीकार करून त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करणे आणि नवीन नवीन गोष्टीची काही माहिती मिळते का याची नोंद करा म्हणजेच नवीन शोध होत राहतील.
पुरातन काळामध्ये युद्ध कलेचा अभ्यास वेगवेगळ्या नावाने केला जायचा कराटे हे एकविसाव्या शतकातील सगळ्यात प्रसिद्ध युद्धाचा खेळ आहे तरी या शतका अगोदर या खेळाला विविध प्रांतांमध्ये देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी संबोधले जायचे वेगवेगळ्या त्याच्या खेळण्याच्या पद्धती विकसित केल्या गेल्या होत्या वेगवेगळ्या नावांनी त्याला संबोधलं जायचं प्रत्येक देश आपल्या आपल्या पारंपारिक पद्धतीने त्या खेळाचा युद्ध कलेचा विकास आणि अभ्यास करत राहायचं आणि हे सातत्य हजारो आणि शेकडो वर्षापासून मानव समाजामध्ये सुरूच आहे मानव समाज हा जसा जसा प्रगत होत जातो परत फिरत असतो परत त्या जुन्या संदर्भातून नवीन काही मिळवत असतो आणि परत उत्कर्षाकडे चालत जातो. त्यानुसार आपण जर पाहिलं तर युद्ध कलेच्या शोधा करिता जन्मदाता म्हणून भारताचं नाव प्रत्येक शोध कर्त्याने आपल्या प्रबंध मध्ये घेतला आहे, ज्यामध्ये वीना शस्त्र कुठल्याही शास्त्राचा वापर न करता हातात शस्त्र न घेता युद्ध करण्याची कला भारताने जगाला दाखवून दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
आपल्या पुरातन काळामध्ये आपण मल्लयुद्ध, मुष्टियुद्ध, गदायुद्ध, धनुर युद्ध, तलवारबाजी इत्यादी अशा अनेक युद्धाच्या क्रीडा प्रकाराबद्दल वाचतो ऐकतो आणि त्याचे संदर्भ आपल्या ग्रंथा मधून विविध पुस्तकांमधून इतिहासाच्या पुस्तकांमधून आपल्याला पाहावयास मिळतात.
हे सर्व अभ्यास करत असताना आपण एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवायला पाहिजे या कलेचा उगम म्हणजे युद्धकलेचे उगम मानवाच्या निर्मिती किंवा मानवाच्या उगमा बरोबरच झालेला आहे. संघर्ष हेच जीवन आणि जिवंत राहण्याकरता संघर्षरत राहणे आपल्या समूहाला संघर्ष करावयास शिकवणे आपल्या माणसाने आपण हा संघर्ष पोट भरण्याकरिता किंवा हा अभ्यास राज्य मिळवण्याकरिता मानवाने करतच राहिला आहे, हा युद्धाचा अभ्यास कधी ही सोडलेला नाही.
आज माणूस वेगवेगळ्या अनु आणि रेणू च्या माध्यमातून युद्ध कसं करता येईल अवकाशामध्ये अंतराळामध्ये युद्धाची वेळ आली तर कसं करता येईल या सगळ्या गोष्टीचा विचार करत आहे तरी सरतेशेवटी त्याला आपल्या हात आणि पाय आणि म्हणजेच शस्त्र शिवाय युद्ध करण्याची गरज नेहमी भासणारच आहे.
म्हणजे कितीही प्रगत शास्त्रज्ञांनी केलेले प्रगत युद्धाचे तंत्र जरी असेल तरी युद्धाचा अभ्यास हाता आणि पायाने म्हणजेच आपल्या बाहुबलाने म्हणजेच आपल्या हातापायांत मानवाला अगदी त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत करावा लागतो हे न संपणारा प्रवास आहे.
युद्धाच्या तंत्राच्या अभ्यासाशिवाय माणूस जगूच शकत नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही भलेही ते युद्ध बुद्धीने असेल तंत्रज्ञानाने असेल विचाराच्या देवाण-घेवाण करून असेल किंवा हात आणि पायाच्या साह्याने असेल ते युद्धच आहे किंवा ते प्रयत्नच असतात आणि हे प्रयत्न हे युद्ध हे स्ट्रगल ही न संपणारी प्रक्रिया शेवटच्या श्वासापर्यंत माणसाला अविरत चालू ठेवावी लागते असे मला वाटते.
सी.ए.तांबोळी( मार्शल आर्ट अभ्यासक,पुणे)
E-mail: catamboli@gmail.com
Mobile: 919823077512
0 Comments