मुदखेड नगरपरिषद आढावा बैठक संपन्न
बारड:(प्रतिनिधी/पिराजी गाडेकर) सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आशोकराव चव्हाण यांनी मुदखेड येथील नगरपरिषद आढावा बैठकिसाठी आले असता पत्रकारांना बोलत
कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा बाबत आरोग्यविषयक बाबीवर तीस कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून यामध्ये सॅनिटायझर, ऑक्सिजन टॅंक, आरोग्य विषयक रुग्णालय सुविधा, मास्क पीपी किट, आरोग्यविषयक अत्याधुनिक सुविधा रुग्णांना मिळण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याची माहिती यावेळी दिली आहे. यावेळी त्यांनी मुदखेड तालूक्यातील विकास कामाचा आढावा घेतला आहे तसेच नगर परिषदेच्या अडचणी जानुन घेतल्या आहेत तसेच कोरोना पार्श्वभूमी असताना मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे शहरात नऊ कोटींचा विकास निधी प्रक्रिया केला आहे.तर जिल्ह्यातील छोटे मोठे रस्ते जिल्हा मार्गाला जोडण्यात आले असून त्यांना क्रमांक देऊन त्यांची विकास कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.तसेच तालुक्यातील संपूर्ण छोट्यामोठ्या पुलाची कामे पण मार्गी लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे .यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख यांनी मराठा आरक्षणा बाबतीत पुढील भुमिका कशी असेल याबाबत माहिती विचारली असता यासाठी आपण आरक्षण बाबतीत प्रयत्नशील असल्याची माहीती चव्हाण यांनी दीली आहे. यावेळी पत्रकार संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख तथा अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे मराठवाडा अध्यक्ष पिराजी गाडेकर यांनी भोकर येथे भव्य क्रीडा संकुल तात्काळ उभारण्यात यावे, मुदखेड येथील क्रीडा संकुलामध्ये विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करण्यात यावी व सुसज्ज करावे, बार्टीच्या धरतीवर पार्टीची स्थापना लवकरात लवकर करण्यात यावी आणि लाभा पासून वंचित असलेल्या तत्सम जातींना न्याय मिळावा, मुदखेड तहशील समोरील बांधकाम पूर्ण झालेल्या गाळ्यांना साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे असे नाव देण्यात यावेे असी मागणी गााडेकर यांनी केली. यावेळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना वसाहत निर्मिती करून देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी रिजर्व बँकेच्या नियमाचे पालन बँकेचे अधिकारी करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.तर सततच्या पडणाऱ्या पावसाने शेतकर्यानंच्या नुसकानीचे पंचनामे करण्यात येणार असून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी काँग्रेस कमेठी जिल्हाअध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नगरपरिषद नगराध्यक्ष मुझीप अन्सारी जागीरदार काँग्रेस तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार शहराध्यक्ष माधव कदम माजी नगर अध्यक्ष सुनील शेट्टे,रोहीदास जाधव, भिमराव कल्याणे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, संजय कोलते, गंगाधर डांगे, मनोज कमटे,उत्तम हनमंते, प्रसिद्धीप्रमुख पिराजी गाडेकर ,अतिक अहेमद, ईश्वर पिन्नलवार, प्रल्हाद मस्के, साहेबराव गागलवाड,नामदेव बिचेवार, सचिन कांबळे ,शेख ईरफान, शेख जब्बार, आशिष कल्याणे,नाममदेव राहेरकर,साहेबराव हौसारे,किशोर पिल्लेवाड आदीची प्रमुख उपस्थित होती.
0 Comments