Latest News

6/recent/ticker-posts

चाकुर पोलीस स्टेशनच्या महारक्तदान शिबिरांमध्ये १२८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

चाकुर पोलीस स्टेशनच्या महारक्तदान शिबिरांमध्ये १२८ रक्तदात्यांनी केले रक्तदान



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) रक्तदान सर्वश्रेष्ठ दान चाकुर पोलीस स्टेशनने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरांमध्ये १२८ रक्तदात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यामध्ये आपले योगदान दिले.चाकुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण व सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड यांनी स्वतः रक्तदान करुन युवकांनपुढे आदर्श ठेवला आहे.


पोलीस स्टेशन चाकुर येथे प्रतिवर्षी गणेशोत्सवात गणेशमंडळे रक्तदान शिबिर आयोजित करतात.पण यावर्षी कोरोना (कोव्हिड-१९)प्रादुर्भावामुळे गणेश मंडळाना गणेश स्थापना बाबत शासनांचे नियम व अटीमुळे रक्तदान शिबीरे आयोजित करने शक्य न झाल्याने व भालचंद्र ब्लड बँक लातुर यांनी चाकुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण यांना केलेल्या कोरोना काळातील रक्त मागणी असताना रक्तपेढीतील रक्तांच्या तुटवड्याच्या अनुषंगाने केलेल्या विनंती वरुन पोलीस निरीक्षक चाकुर यांनी पोलीस अधिक्षक लातुर,अप्पर पोलीस अधिक्षक लातुर यांच्या मार्गदर्शनुसार उपविभागीय पोलीस अधिकार विद्यानंद काळे,चाकुर तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर आयोजित केले.सदर रक्तदान शिबिरांस पोलीस स्टेशनचे दुय्यम अधिकार व कर्मचारी,रोटरी क्लब चाकुर,बजरंगदल चाकुर,जिजाऊ प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य,तसेच चाकुर शहरांतील युवक,नळेगांव दुरक्षेञ,वडवळ (ना),रोहीणा इतर बिट भागातील दानशुर रक्तदात्यांनी रक्तदान केले. एकुण १२८ ब्लड इतका रक्तसाठा उपलब्ध झाला. रक्तदान शिबिरांत प्रमुख आयोजक चाकुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण, साहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड,उपोनि ञ्यंबक गायकवाड,उपोनि.खंडु दर्शने,उपोनि निलम घोरपडे,पोहेकॉ रामचंद्र गुडरे,बाळु आरदवाड,व चाकुर पोलीस स्टेशनचे सर्वच कर्मचारी आदिच्या परिश्रमांतुन शिबिर यशस्वी झाले.


Post a Comment

0 Comments