Latest News

6/recent/ticker-posts

केळगावमध्ये अहिल्यादेवी होळकर प्रतिमेस अभिवादन

केळगावमध्ये अहिल्यादेवी होळकर प्रतिमेस अभिवादन



केळगाव:(प्रतिनिधी वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील केळगाव येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गावातील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी भाजपाचे सुधाकर चव्हाण, विविध कार्यकारी सोसायटी व्हाईस चेयरमन एकनाथ काळे (बापू),तंटा मुक्ती उपाध्यक्ष दत्ता काळे,नामदेव काळे, पिंटू काळे,मॅचिंद्र काळे,अंगद काळे,बिभीषन काळे,लखन परळे,मुरली परळे,सह धनगर समाजातील युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जुन्या प्रथा लाथाडुण तत्कालीन रिवाजानुसार स्त्री असूनही सती न जाता लोककल्याणकारी राज्य निर्मिती वाचवण्यासाठी तलवार हाती घेऊन तब्बल 29 वर्षे अत्यंत सक्षमपणे आदर्श न्यायप्रिय राज्य करणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त सर्वांनी विनम्र अभिवादन करून येळकोट ! येळकोट !! जय मल्हारच्या घोषणा दिल्या. 


Post a Comment

0 Comments