भादा येथे एकास निरोप तर दुसर्याचे पदग्रहण
औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख)दि. २४ मौजे भादा येथील ग्रामसेवक उमेश बनसोडे यांची बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला तर याच वेळी नूतन ग्राम विकास अधिकारी सूर्यवंशी माणिक यांचे स्वागत करण्यात आले. भादा ग्रामपंचायतमध्ये सोमवार दि २४ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी भादा या ठिकाणी कार्यरत असलेले ग्रामसेवक उमेश बनसोडे यांना निरोप देण्यात आला. तर याच ठिकाणी नवीनच बदलून आलेले ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी यांचे स्वागत करण्यात आले. मागील सहा वर्षापासून येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक उमेश बनसोडे यांनी गावातील विविध योजना आणि शासकीय कामकाज याबाबत दक्ष राहून सर्व कामे वेळेवर केल्याचे या ठिकाणी उपस्थित जनसमुदायाने सांगितले. तरुण मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने माझे सहा वर्षे कशी पूर्ण झाले हे समजले नसल्याचे बनसोडे यांनी सांगितले. तर भविष्यात मीही भादा गावाला कोणतेही अडचण किंवा समस्या येऊ नये या पद्धतीने कार्य करीन असे नुकतेच पदभार घेतलेले मातोळा येथून बदली झालेले ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भादा ग्रामपंचायत सर्व कर्मचारी आणि माजी सरपंच,सामाजिक कार्यकर्ते,आदी उपस्थित होते.
0 Comments