महाजन कुटुंबिया तर्फे संतबाबा कुलवंतसिंघजी यांचे स्वागत
नांदेड: प्रतिनिधी)दि. २० - ऑगस्ट गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी हे मुंबईहून उपचार घेऊन परत आल्यावर महाजन इस्टेट नंदीग्राम सोसायटी जवळ सरदार लड्डूसिंघ महाजन कुटुंबिया तर्फे त्यांचे पुष्पवृष्टि करून भव्य असे स्वागत करण्यात आले. गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष असलेले स. लड्डूसिंघ महाजन, त्यांची पत्नी सौ. कुलतारकौर, माजी नगरसेवक स. शंकरसिंघ गाडीवाले, स. जीतसिंघ दुकानदार, गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य गुरमीतसिंघ महाजन, नारायण सिंघ तबेलेवाले, जसपालसिंघ गाड़ीवाले, चरणजीतसिंघ महाजन, दर्शनसिंघ कोल्हापुरे, सनीसिंघ बुंगई, प्रीतमसिंघ कामठेकर, गुरुप्रीतसिंघ महाजन सह महाजन परिवारातील सदस्य व मित्र परिवाराची उपस्थिती होती. यावेळी बाबाजींच्या स्वास्थ्य विषयी चौकशी बाबाजींना शुभेच्छा देण्यात आल्या. बाबाजींच्या स्वागतात रस्त्यावर पुष्पसजावट करण्यात आली होती.
0 Comments