Latest News

6/recent/ticker-posts

अनिलभैय्या चव्हाण-कोरोना संकटकाळात लढणारा निर्भयी योद्धा

अनिलभैय्या चव्हाण-कोरोना संकटकाळात लढणारा निर्भयी योद्धा



संपूर्ण जग गेल्या पाचसहा महिन्यापासून कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे.तीच संकटाची लाट आता आपल्या घरापर्यंत पोचली आहे.चाकूर तालूक्यातील नळेगाव सुद्धा गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे.प्रत्येकजण आपापल्या परीने या संकटाशी लढत आहे.काळजी घेत आहे. पण या सर्वामध्ये एक अवलिया असा आहे की जो गेल्या चार पाच महिन्यापासून सतत रस्त्यावर आहे.प्रत्येकाच्या हाकेला ओ देवून धावतो आहे.स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वांसाठी जीवाची पर्वा न करता लढतो आहे.ग्रामपंचायत सदस्य,माजी पंचायत समिती सदस्य अशी अनेक पदे नावामागे असली तरी समाजसेवा हे एकच ध्येय समोर ठेवून वागणारा हा योद्धा म्हणजे अनिल चव्हाण. रक्तदानशिबीर,वैकुंठरथ यासारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम अनिलभैय्या सातत्याने राबवत असतोच. पण या कोरोनाकाळात करत असलेल्या त्यांच्या कार्याची ऊंची व किंमत अनमोल आहे. कारण या काळात स्वतःच्या कुटुंबातील मृतदेह स्वीकारायला सुद्धा लोक घाबरत असताना अनिलभैय्या मात्र प्रत्येक ठिकाणी धावून जात आहे. अगदी कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात अँटी कोरोना फोर्सची टीमची स्थापना करण्यात पुढाकार घेऊन रात्रंदिवस त्यांच्या समवेत राहून प्रत्येक अडचणीतून मार्ग काढला.


संपुर्ण गावात प्रत्येक व्यक्तीला स्वखर्चाने मास्कचं व आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप केले.या कामी मदत करणाऱ्या प्रत्येक मित्रांच्या आरोग्याची काळजी सातत्याने घेतली.सोशल डिस्टन्स,सॅनिटायझिंग इत्यादी बाबत सतत सर्वांचे समुपदेशन करत राहिले.प्रशासकीय पातळीवरूनही आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्न केले. प्रत्येकांनी एवढी काळजी घेवूनही कोरोनाने घात केलाच.नळेगावात अल्प काळातंच कोरोनाचा राक्षसी विळखा पडला.एकामागून एक कोरोनाबाधित रूग्ण वाढू लागले व अत्यंत संपर्कातील लोकांना स्वतःची कोरोना चाचणी करून घेण्याची विनंती केली, बाधित चाकूरला पाठवणं सुरू झालं. अचानक वाढलेल्या रूग्णसेवेने शासकीय यंत्रणेचीही धावपळ उडाली.यावेळी डगमगून न जाता नळेगावहून अगदी लहानसहान वस्तूपासून ते प्रसंगी जेवणाच्या डब्यापर्यंतची सोय अनिल व त्याच्या मित्रमंडळींनी केली वारंवार या बांधवांच्या संपर्कात राहून हिंमत दिली हे बांधव घरी परत येईपर्यंत त्यांची काळजी ते घेत आहेत इकडे गावातही कंटोनमेंट झोन वाढत होते बाधित रुग्णाच्या कुटुंबियांना व शेजाऱ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत होते.यातून सुद्धा अनिल चव्हाण यांनी मार्ग काढला.मित्रांच्या साह्याने या सर्व बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचा व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा चालू केला. यावेळी त्यांनी कोरोनाची मला लागण होईल का, मी संपर्कात कसं जाऊ असा विचार केला नाही तर उलट आज माझ्या नळेगावकर बांधवांना मदत व मानसिक आधाराची खरी गरज आहे हे ओळखून चोवीस तास हा लढवय्या फिरत राहीला कुणी दुकाने बंद करून तर कुणी दरवाजे बंद करून स्वतः व कुटुंबियांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करत असताना हा ध्येयवेडा मात्र नळेगाव हेच माझे कुटुंब व नळेगावकर हेच माझे कुटुंबिय म्हणून सर्वांसाठी अभिमन्यूप्रमाणे हिमतीने निकराची लढाई लढत आहे.त्याच्या या समाजसेवी वृत्तीस त्रिवार वंदन ही त्याची धडपड पाहून अनिलभैय्यासारख्या अशाा लढाऊ बाणा असणाऱ्या या समाजसैनिकास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना ईश्वरचरणी करावी वाटते.


 


संतोष तेलंगे, नळेगाव 


Post a Comment

0 Comments