Latest News

6/recent/ticker-posts

सोलापूर शासकीय रुग्णालयात रक्षाबंधन साजरा

सोलापूर शासकीय रुग्णालयात रक्षाबंधन साजरा



रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते. 


सोलापूर:(प्रतिनिधी) बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन.  देशात राज्यात व जिल्हात कोरोना रुग्णाची आकडेवारी वाढत आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत त्याना हॉस्पिटल व क्वॉरनटाईन सेंटर मध्ये पाठवल जात आहे. काल रक्षाबंधनाच्या पाश्र्वभूमीवर सोलापूर मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयामध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णाना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला.


रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.  बहीण भावाचे नाते संबंध जिव्हाळा जपणारा हा सण उपचार घेत असलेले भाऊ आणि भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करणारी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून हा सण साजरा करण्यात आला.


यावेळेस महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतच्या राज्याध्यक्ष तसेच प्राचार्या मनिषाताई शिदे व त्याच्या सर्व नर्स व सहकारी यांनी मिळून रक्षाबंधनाचा उपक्रम राबवला.


Post a Comment

0 Comments