उदय गणेश मंडळ चाकुरच्या वतीने रक्तदान शिबिर
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) कोरोना संकटात सध्या रक्तांचा तुटवडा भासत आहे.लातुर जिल्ह्यातील रक्तपेढी ब्लड बँका रक्तदान करण्यांचे आव्हान करीत आहेत.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.उदय गणेश मंडळाच्या सर्व पदधिकारी यांनी समाज उपयोगी कार्य म्हणून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते.त्या शिबिरांमध्ये युवकांनी उत्सुकतेने रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यामध्ये योगदान दिले.
दि. २८.०८.२० रोजी न्यू उदय गणेश मंडळाच्या वतीने वार्षिक गणेशोत्सव व सर्वोत्तम कुलकर्णी यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त श्री. दत्त मंदिर चाकूर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व उदघाटक म्हणून नरेश पाटील चाकूरकर हे होते. व कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सर्वोत्तम कुलकर्णी होते.
कार्यक्रमाची सुरुवात नरेश पाटील चाकुरकर, सर्वोत्तम कुलकर्णी, श्रीनिवास निलंगेकर,मुरलीधरराव जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. व त्या नंतर नरेश पाटील यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना झाडे लावा,
पाण्याची बचत व रक्तदान या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. व या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप सर्वोत्तम कुलकर्णी यांनी केला.
व रक्तदानाला सुरुवात झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरराव चाकूरकर यांनी केले. व प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष ओंकार चाकूरकर यांनी केले.व आभार प्रदर्शन आदित्य कुलकर्णी यांनी केले.
या कार्यक्रमाला अजीम सय्यद,पञकार सुधाकर हेमनर, प्रा.अ. ना. शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.
व तसेच कार्यक्रमासाठी लातूर ब्लड बँक चे कर्मचारी हे ही उपस्थित होते.व मंडळाचे कार्यकर्ते शौनक शास्त्री,श्रीकर कुलकर्णी,गणेश गंजरे,प्रसाद देशमुख,सौरभ कुलकर्णी,भागवत जोशी,पार्थ जोशी,प्रमोद जोशी,आदित्य कुलकर्णी,ओंकार चाकूरकर, ओमकार शास्त्री,वैभव शास्त्री, प्रसाद निलंगेकर, ऋषिकेश निलंगेकर, अभिजित जोशी, शुभम कुलकर्णी, प्रशांत चाकूरकर हे सर्व उपस्थित होते.
0 Comments