Latest News

6/recent/ticker-posts

नियमांचे काटेकोर पालन करूनही भादा गावात कोरोनाची एन्ट्री

नियमांचे काटेकोर पालन करूनही भादा गावात कोरोनाची एन्ट्री



औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख) दि.२३ -


औसा तालुक्यातील मौजे भादा येथे कोरोना आजार सुरु झाला तेव्हापासून आजतागायत आजाराने शिरकाव केला नव्हता. सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनही गावात कोरोना आजाराने शिरकाव केला आहे.आज कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात कोरोनायोद्धा यांनी स्वयंस्फूर्तीने चांगल्या पद्धतीचे नियोजन घालून आज तागायत चांगली व्यवस्था केली होती. पोलीस प्रशासनाने ही व्यवस्थित असा बंदोबस्त केला होता, काही स्वयंसेवकांनीही रात्रंदिवस एक करून गावाची देखभाल केली होती. असे वाटत होते की गावात शेवटपर्यंत एकही रुग्ण आढळणार नाही. मात्र आज एक रुग्ण आढळून आल्याने गावाने केलेला संकल्प मोडीस निघाला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने वेळोवेळी फवारणी करून स्वच्छता राखली होती, गावातील दुकानदारांनी प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन केले होते, नागरिकांनीही आपल्या घरांमध्ये राहून प्रशासनाला सहकार्य केले होते, इतके सर्व नियम पालन करून शेवटी covid-19 रुग्ण सापडल्याने भादेकरांच्या आशेवर पाणी पडले. "गावातील लोकांनी घाबरून न जाता घरी राहून स्वतःची व घरातील लोकांची काळजी घ्यावी जेणेकरून हा आजार गावात जास्त फैलाव करणार नाही." अशी प्रतिक्रिया गावातील सुजान नागरिक बालाजी उबाळे यांनी इशाराच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.


Post a Comment

0 Comments