लातूर नांदेड मुख्य रस्त्यावरील खड्यांचा मनसेकडून हार घालून सत्कार
जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही धडा शिकवू आणि येत्या काही दिवसात जर रस्ते दुरुस्त नाही केले तर तीव्र रस्ता-रोको आंदोलन करून त्यावेळी संबंधित विभागाच्या अभियंत्याला खड्यामध्ये बसवून अंघोळ घातल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांनी व्यक्त केली.
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) गेली अनेक दिवसांपासून नांदेड लातूर मुख्यरस्त्यावर अहमदपूर ते चाकूर पर्यंत चंद्रावरील खड्यांनाही लाज वाटेल एवढे मोठे खड्डे पडले आहेत.रोड नांगर मारल्यागत अवस्था झाली आहे याचा निषेध नोंदवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर येथे लातूर नांदेड हायवे वर खड्यांना पुष्पाहर घालून प्रतिकात्मक आंदोलन करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाल्यामुळे रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.लोकांना मणक्याचे आजार होत आहेत.दर वाढलेल्या इंधनाचा अपवेय होत आहे.जनतेचा वेळ वाया जात आहे आणि एवढे सारे होत असतानाही संबंधित विभाग डोळे झापून बसला आहे.रस्ते,पाणी,विज ह्या बाबी हा जनतेचा अधिकार आहे व त्यासाठीच जनता कोट्यवधी रुपयांचे टॅक्स शासनाला भरत असते व शासन दुर्लक्ष करेल तेव्हा लोकप्रनिधींनी पुढे यावे म्हणून त्यांना निवडून देत असते.परंतु लोकप्रतिनिधी व शासन हे रस्ते दुरुस्ती करत नसल्यामुळे मनसेला हे आंदोलन करायचे पाऊल उचलावे लागले.या वेळी या आंदोलनामध्ये जिल्हाउपाध्यक्ष राजीव मोहगावकर,तालुकाअध्यक्ष डॉ.मिलिंद साबळे,भुजंग उगीले,यश भिकाणे, माधव राठोड,कृष्णा जाधव,अमोल जाधव,धनाजी जाधव,बालाजी पवार,आदी उपस्थित होते.
0 Comments