रमजान ईद प्रमाणेच बकरीईद वरही कोरोना आजाराचे सावट
औसा: (तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख)दि. १ इस्लाम धर्मातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या रमजान व बकरीईद वर यावर्षी कोरोना चे सावट दिसून आले. शहरात प्रत्येकाने आपापल्या घरात ईदची नमाज अदा केली व प्रार्थना केली की बाकीचे आमच्या हिंदू बांधवांचे सण आहेत त्या सना पर्यंत तरी देवा हा आजार कमी कर. सण म्हटले की एकमेकांची गळाभेट असते ती यावर्षी दोन्ही सणाला घेता आली नाही लहान मुले वेगवेगळ्या पाहुण्यांकडे भेटीसाठी जातात ते यावर्षी जाता आले नाही म्हणजेच त्यांचा कोंडमारा झाला. त्यांच्या मित्रांना त्यांना भेटता आले नाही सण असूनही सण नसल्यासारखे त्यांना वाटत होते. मुले एकमेकांना बोलून देखील दाखवली "आज ईद है ऐसा नही लग रहा"
औसा शहरात कालपासूनच वातावरण थोडे गंभीर होते, या वातावरणाला पाहूनच शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त केला होता.
वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी ईदगाहवर नमाज पडण्याची परवानगी मागितली होती मात्र ती मिळाली नाही. त्यामुळे "आलिया भोगासी,असावे सादर" या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने नियमांचे पालन करून आपापल्या घरात सण साजरा केला.
0 Comments