भाजपा महायुतीचे दुधप्रश्नी चाकूर येथे रास्तारोको आंदोलन
तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी मागणीचे निवेदन स्विकारले
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) कोरोनात अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला सरसगट प्रति लिटर १० रुपये अनुदान द्यावे दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे आणि गाईच्या दूध खरेदी दर ३० रुपये प्रति लिटर करावा या मागणीसाठी भाजपा महायुतीच्या वतीने येथे दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आदोलनात भाजपा आणि महायुतीतील रासप, रिपाई आठवले गट कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱी, लोकप्रतिनिधी यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येनी आंदोलनात सहभागी झाले होते. वेळी सुरक्षित अंतराचा नियम पाळून सर्वानी मास्कचा वापर करून आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले व राज्य सरकारच्या नाकर्तेपणा चा खरपुस समाचार घेतला आज संपूर्ण राज्यभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने दुध दरवाढ तसेच प्रतिलिटर १० रु.अनुदान व दुध भुकटीस प्रतिकिलो ५० रु.चे अनुदान मिळावे या मागणीसाठी चाकुर येथे सेफ डिस्टन्स ठेवुन भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यानंतर जिल्हा उपाध्यक्षा बालाजी पाटील चाकुरकर यांच्या सह शेकडो कार्यकत्यांना पोलीसांनी अटक केली. त्यानंतर प्रत्यक्ष आंदोलन स्थळी चाकूरचे तहसीलदार डॉ.शिवानंदजी बिडवे यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्विकारले.
याप्रसंगी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव डिगोळे, क्रषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोकराव चिंते,रणजित पाटील,ता.अध्यक्ष शिवाजीराव बैनगिरे, जिल्हा परिषद सदस्य सौ.अर्जुनेताई व कसबे, सुरेश हाके पाटील ,चाकूर शहराध्यक्ष प्रशांत बिबराळे, शामराव मुंजाने, अजित खंदारे, दयानंद सुर्यवंशी, अशोक शेळके आदी पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments