Latest News

6/recent/ticker-posts

औसा शहरात व्यापाऱ्यांना covid-19 ची तपासणी केली सक्तीची.

औसा शहरात व्यापाऱ्यांना covid-19 ची तपासणी केली सक्तीची.



औसा:(तालुका प्रतिनिधी बी. जी. शेख) दि. १२ - जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात दिनांक 13 तारखेपासून लाॅकडाऊन मध्ये शिथीलता दिली जाईल. मात्र शहरातील व्यवसायीकांनी स्वतःची कोविड-१९ ची तपासणी करून घेतल्याशिवाय दुकान उघडता येणार नाही. अशी सक्तिवजा आदेश स्थानिक नगराध्यक्ष अफसर शेख यांनी येथील व्यापाऱ्यांना केला आहे. सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःची तपासणी करून घ्यावी अन्यथा दंड आकारला जाईल अशा प्रकारची सूचना केली आहे. औसा तहसीलदार शोभा पुजारी, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण व आरोग्य अधिकारी यांनी सर्व सूचनांचे पालन केल्याशिवाय दुकान उघडता येणार नाही असे म्हटले आहेे .स्थानिक व्यापार्‍यांचे टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाईल. शहरात दुचाकी वाहन वाल्यांनी हेल्मेट व मास्क घालूनच आपल्या कामानिमित्त फिरावे. नियमांचे पालन न करणाऱ्यास दंड आकारला जाईल असा सज्जड इशाराही देण्यात आला आहेे .लाॅकडाऊनच्या काळामध्ये आधीच कंबरडे मोडलेल्या व्यापार्‍यावरती अशा प्रकारचे नियम लादल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.


Post a Comment

0 Comments