कोरोना महामारीत उपचार घेत असताना मृत्यु पावलेल्या व्यक्तीचे अंत्यविधि मूळगावी करण्यात यावे
अहमदपूर: (प्रतिनिधी)विश्वात थैमान घातलेल्या कोविड-१९ महामारीत पॉझिटिव होणारे रुग्ण आपल्या मूळ गावाहून जिल्हास्तरीय उपचाराकरिता विविध रुग्णालयात उपचार करण्यासाठी रुग्ण दाखल होतात.
कोरोना पॉझिटिव्ह येथे अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चा उपचार दरम्यान मृत्यू होत असून मयत व्यक्तींचा अंत्यविधी ज्या ठिकाणी उपचार सुरु आहे त्याच ठिकाणी करण्यात येत असल्यामुळे अंत्यविधी झाल्यानंतरच्या अनेक धार्मिक विधी पासून परिवारास वंचित राहावे लागत आहे कोरोना संक्रमित मृत्यू झालेल्या व्यक्तींची अंत्यविधी संपूर्ण प्रक्रिया शासन करत असून अंत्यविधी मृत्यू गावाहून खूप दूर अंतरावर होत असल्यामुळे अंत्यविधी नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तसेच विविध धर्माच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती करण्यासाठी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा परिसरात वंचित राहावे लागत आहे म्हणून कोरूना महामारीत बळी पडणाऱ्या व्यक्तीस मग तो कोणत्याही समाजाचा असेल त्या व्यक्तीचे अंत्यविधी हे त्याच व्यक्तीच्या मुख्य गावी परिसरात इच्छा जाणून घेऊनच करण्यात यावे जेणेकरून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधी नंतर च्या विधी करण्यात येणाऱ्या धार्मिक पिढीला पूर्ण करता येईल म्हणून मुस्लिम विकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रबोध्द मुळे यांना देण्यात आले आहे यावेळी मुस्लिम विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष शेख अय्याज जहुरसाब, आघाडीचे सल्लागार शेख असलम, आघाडीचे संघटक शेख मासूम, आघाडीचे तालुका अध्यक्ष सय्यद माजिद, शहराध्यक्ष शेख हाजी सामाजिक कार्यकर्ते गौस मणियार,आधी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. जर ही मागणी मान्य नाही झाल्यास लोकशाही पद्धतीने आघाडीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
0 Comments