विलासराव देशमुख यांच्या ८ व्या स्मृति दिनानिमीत्तचा सामुहिक आंदराजली कार्यक्रम होणार नाही
कोविड-१९ प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमिवर देशमुख कुंटूबियाचा निर्णय
लातूर:(प्रतिनिधी) संपूर्ण देश आणि राज्यातील कोवीड-१९ प्रादूर्भावाच्या परिस्थितीत अद्याप म्हणावी तशी सुधारणा न झाल्यामुळे आणि लॉकडाऊन सुरू असल्याने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमीत्त १४ ऑगस्ट रोजी बाभळगाव येथील विलासबाग येथे होणारा सामुहिक आंदराजलीचा कार्यक्रम यावर्षी होणार नसल्याचे देशमुख कुंटूबियाच्या वतीने कळविण्यात आले आहे. आदरणीय विलासराव देशमुख यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमीत्त १४ ऑगस्ट रोजी बाभळगाव येथील विलासबाग येथे सामुहिक आंदराजलीचा कार्यक्रम नियमीतपणे आयोजित केला जात असतो, त्या ठिकाणी लातूर जिल्हयासह राज्य आणि देशभरातील अनेक मान्यवर आणि सामान्य नागरिक येऊन आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली अर्पण करीत असतात. कोविड-१९ विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सद्या राज्य आणि देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सामाजिक, वैयक्तिक आंतर पाळून या विषाणुचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे एकत्रित लोक जमा होण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सदरील परिस्थीती लक्षात घेता आदरणीय विलासराव देशमुख यांच्या ८ व्या स्मृतिदिनी बाभळगाव येथे सामुदायीक आदरांजली कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भाने देशमुख कुटुंबियाकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली असुन सर्वांनी आहे त्या ठिकाणी राहूनच आपल्या नेत्याला आदरांजली अर्पण करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
0 Comments