Latest News

6/recent/ticker-posts

राजीव गांधी कर्णबधिर व मूकबधिर निवासी विद्यालयत स्वातंत्र्य दिन साजरा

राजीव गांधी कर्णबधिर व मूकबधिर निवासी विद्यालयत स्वातंत्र्य दिन साजरा



देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) लोक उन्नती बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव द्वारा संचलित राजीव गांधी कर्णबधिर व मूकबधिर निवासी विद्यालय तळेगाव (भो) येथे ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने कोरोना महामारी covid-19 या रोगामध्ये मौजे तळेगाव येथे कोरोना योध्या म्हणून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.भगवान गायकवाड व प्रमुख पाहुणे म्हणून घोणसे मलबा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष लातूर, संग्राम कोरे व ग्रामसेवक एस.आर.गोरे,तलाठी ए.यस.तिळगुळ, आरोग्य कर्मचारी एस.पी.शिंदे,आरोग्य सेविका डी.डी.बनसोडे,


तुकाराम पाटील देवणीकर, ग्रामपंचायत सदस्य विळेगावे ज्ञानोबा तानाजी अटरगे, ग्रामपंचायत कर्मचारी माचे संदीप व कोरे संजय आशा कार्यकर्त्या पाटील बबिता, सुरवसे रंभा, माचनाळे विद्याताई, नमनगे सुवर्णा, पवार प्रभाताई,कासले भूमिकाताई यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले संस्थेच्या अध्यक्षा कालिंदा गायकवाड, राम धनेगावे, कांळे नरसिंग उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैय्यासाहेब तुकाराम देवणीकर यांनी केले व आभार सत्यवान वाघमारे यांनी केले यावेळी गावातील नागरिक व शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments