कोरोना संरक्षक साहित्याचे वाटप
लातूर:(प्रतिनिधी) लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या ८ व्या स्मृती दिनानिमित्त व शिक्षक काॕंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा-सरचिटणीस सौ.मंदाकिनी गंभीरे - भालके यांच्या जन्मदिनानिमित्त कोरोना संरक्षक साहित्याचे वाटप. सर्व जग आज कोरोना महामारी च्या संकटाचा सामना करत आहेआणि या संकट काळात आपली ढाल बनून आपल्या आरोग्याची काळजी घेत असलेल्या आशा कार्यकर्ता व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना डॉक्टर व सर्व कर्मचारी आप आपली जबाबदारी अगदी चोख बजावत आहेत. आपण ही त्यांना काही तरी मदत करावी या हेतुने लोकनेते विलासराव देशमुख स्मृती दिन व मंदाकिनी गंभीरे-भालके यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधुन आज गंभीरे - पाटील परिवार सिकंदरपुकर यांच्या तर्फे आवश्यक आरोग्य संरक्षक साहित्य सिकंदरपुर येथील अंगणवाडी ताई,आशा कार्यक्रर्ती व मदतनीस तसेच ५० वर्षा पुढील जेष्ठ नागरीक व महिला बचत गटाच्या सदस्यांना भेट स्वरूपात देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना सर्व साहित्य पुरवठा होत आहे. तरी सामाजीक बांधीलकी म्हणून गंभीरे परीवाराच्या वतीने त्यांना उपयुक्त असे N-95 mask, सॕनेटाईजर स्प्रे, Dettole hand wash, Handgoves साहित्य देण्यात आले. आज आपण सर्वांनी आपली काळजी स्वतःघेणे तर आवश्यकच आहेच परंतू सामाजिक बांधीलकी जपणे सुध्दा तेवढेच गरजेचे आहे.
0 Comments