जाकेर भाई मित्र मंडळाचा दुसरा वर्धापन दिन वृक्षा रोपन करून साजरा
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथील जाकेर भाई मित्र मंडळाचा दुसरा वर्धापन दिन कोरोना मुळे वृक्षा रोपण करून साजरा केला,दरवर्षी रक्तदान शिबीर,शालेय साहित्य वाटप व विविध सामाजिक उपक्रमं राबुन साजरा केला जातो,मात्र यावर्षी साध्या पद्धतीने किनगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षा रोपन करून साजरा करण्यात आला.यावेळी माजी संरपच विठ्ठलराव बोङके,जाकेर भाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जाकेर कुरेशी,ग्रामसेवक आर.जि.कांबळे,तलाठी हसंराज जाधव,डॉ.प्रमोद सांगवीकर, डॉ.किशोर कांदे,कोपरा येथील उपसंरपच बालाजी आचार्य, ग्रा.प.सदस्य धम्मांनद कांबळे,औषध निर्माता बुक्के,किनगांव मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेटींबा श्रृंगारे, पत्रकार अफजल मोमीन, पंडीतराव बोडके,रत्नाकर नळेगावकर, संजीवकुमार देवनाळे,गोरख भुसाळे, बालाजी गायकवाड,दिपक सुर्यवंशी,असमत शेख,इम्रान कुरेशी,तोहिद कुरेशी,आदींजन उपस्थित होते.
जाकेर भाई मित्र मंडळ संताळा शाखेचे वतिने देखील प्राथमिक आरोग्य केंद्र व येथील सर्व अगंणवाडी येथे वृक्षा रोपन करून मित्र मंडळाचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी माजी सरपंच रघुनाथ महाळंकर,दत्ता खदाडे, दिपक सर्यवंशी,असमत शेख,राजु शेख,रमाकांत टोपे,अजित महाळंकर, शिकलकर मुन्ना,बालु गायकवाड, गोपाळ मामा,मंगल सोमवंशी,अगंणवाडी सेवीका जनाबाई महाळंकर,सरस्वती भोसले, तुळसाबाई मुंडे,निरमला उळागेट, आशा टोपे,आदी जन उपस्थित होते.
0 Comments