लॉकडाऊन काळातील मसिहा शेख अय्याजभाई यांचा सत्कार
जाबेरभाई मिञ मंडळाचा पुढाकार
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) अहमदपुर शहरामध्ये लॉकडाऊनच्या काळा मध्ये गरजुवंताना आन्नदान करण्यात मोलाचे योगदान देणारे मुस्लीम विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष शेख अय्याज जहुर यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.अनेक समाज उपयोगी काम करुन त्यांनी योगदान दिले.पोलीस प्रशासनांच्या आहवानांस प्रतिसाद म्हणून शहरातील नागरिकांना वेळोवेळी मदत करण्यात खारीचा वाटा उचलला.पोलीस वाहनांमध्ये स्वतःजातीने बसुन नागरिकांना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यासाठी शहरात फिरुन जनजागृती केली.
प्रभांग क्रमांक 9 मध्ये प्रभागातील नागरिकांना सॕनेटाईजर होम बनवुन लोकाची सेवा केली.नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आरोग्यास पोषक म्हणून मालेगांवचा काळा बनवुन लोकांना पाजवले.परराज्यातील लोकांना लॉकडाऊन काळात प्रशासनाच्या सहकार्यने बस सेवा उपलब्ध करुन देऊन लॉकडाऊन मध्ये अडकलेल्यांना त्यांच्या गावी पोहचविण्यात मोलाची मदत केली.अहमदपुर शहरातील बेवारस असणाऱ्या लोकांना त्याच्या जवळ जाऊन त्यांना जागेवर खिचडी वाटप केली.शहरात कडेकोट बंदोबस्त असताना आपल्या संघटनेच्या सदस्यांना घेऊन गंरजुवताना घरपोच सेवा दिली.असे अनेक समाजउपयोगी काम करणाऱ्या खर्या कोरोना योध्दांचा सत्कार त्याचा मानसनमान वाढवावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन जाबेरभाई मिञ मंडळाच्या वतीने मुस्लीम विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यांचा शाल,हार,श्रीपळ,देऊन त्यांचा कार्यालया मध्ये करण्यात आला.यावेळी जाबेरभाई,तबरेज,मासुम शेख,उपस्थित होते.
0 Comments