लातुर जिल्ह्यात कोरोनाचे १३१ रुग्णांची भर
लातुर:(प्रतिनिधी) लातुर जिल्ह्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. संध्या जिल्ह्यात १९३० कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. दि. १९ रोजीच्या अहवालात १३१ तर प्रलंबित अहवालातील २३ असे १५४ रुग्णाची यादी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञाण संस्थेने प्रसिध्द केली आहे.
लातुर जिल्ह्यात खूप मोठीप्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्च निघाले आहेत. प्रशासन आपल्या परिने उपाययोजना करीत असले तरी नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहेत. यामुळेच दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. आज पुन्हा १३१ रुग्णांची भर पडली असून उपचाराने बरे झालेल्या २४३ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत ५७५५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर ३६५७ रुग्ण उपचाराने बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली आहे. तर मृत्यूच्या आकड्याने २०० अंकडा गाठला असलातरी कोरोनामुळे मृत्यू झाला असलातरी नोंदी घेतल्या जात नसल्याची आरोड होत आहे.
जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आजच्या अहवालात तालुका निहाय रुग्ण संख्येत लातूर- ११२, औसा- १६, उदगीर- ७, निलंगा- ७, चाकुर- ६, अहमदपूर- ३ जळकोट- २, रेणापूर- १ तर उदगीर मध्ये निघालेल्या रुग्णात विकास नगर- २, वाढवणा- १, समतानगर- २, हिप्पळगा- १, हनुमान गल्ली- १ अशी रुग्ण संख्या आहे. आज २४३ रुग्णांना सुट्टी देण्यात आली यात लातूर- ११६, उदगीर- १३, देवणी- १३, चाकुर- १०, रेणापूर- १४,औसा- २०, निलंगा- १२, अहमदपूर- १८ जळकोट- २ तर घरी अलगीकरणात आसलेले २५आदींचा समावेश आहे.
0 Comments